Home » ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य » रॉबर्ट वढेरांना होऊ शकते दोन वर्षांची शिक्षा

रॉबर्ट वढेरांना होऊ शकते दोन वर्षांची शिक्षा

Robert Vadraगुडगाव, [२१ डिसेंबर] – कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या मालकीची हरयाणात १४६.७५ एकर जमीन असून, त्यातील काही जमीन विकल्याचा दावा करणार्‍या वढेरांच्या नावे अजूनही हरयाणा कमाल भूसंपादन कायदा १९७२ नुसार निर्धारीत मर्यादेपेक्षा जास्त जमीन आहे. त्यामुळे याप्रकरणी त्यांना दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गुडगाव, फरिदाबाद, मेवात आणि पलवल जिल्ह्यातील तब्बल १४६ एकरांपेक्षा जास्त जमीन वढेरा आणि त्यांच्या पत्नीच्या मालकीची आहे. यापैकी बहुतांश जमीन ‘स्काय लाईट रिऍलिटी’,‘स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी’ आणि ‘ब्ल्यू ब्रिझ ट्रेडिंग’ या कंपन्यांच्या नावावर आहे. मात्र, या सर्व कंपन्यांचे ९९ टक्के समभाग रॉबर्ट वढेरा यांच्या नावे आहेत. दरम्यान, २०१० आणि २०१२ या वर्षात वढेरा यांनी ८२.२ एकर जमीन विकली असली तरी अद्यापही त्यांच्या नावे भरपूर जमीन आहे. यापैकी कोणत्याही व्यवहाराची कागदपत्रे त्यांनी संबंधित यंत्रणेकडे सोपविली नाहीत. आपल्या नावे असलेल्या अतिरिक्त जमीनीचा खुलासा न करणे वढेरा यांना महागात पडणार असल्याचे दिसते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19149

Posted by on Dec 22 2014. Filed under ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य (2314 of 2452 articles)


वलसाड, [२१ डिसेंबर] - विश्‍व हिंदू परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘घर वापसी’ अभियानांतर्गत शनिवारी दक्षिण गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात सुमारे २०० ...

×