Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » रोजगार वृद्धीसाठी ३ देशांचा दौरा!

रोजगार वृद्धीसाठी ३ देशांचा दौरा!

=पंतप्रधानांचे ट्विट=
Modi-2-TWITTERनवी दिल्ली, [२८ मार्च] – देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासह रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करणे याच एकमेव उद्देशाने आपण पुढील महिन्यात फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडाचा दौरा करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी दिली.
भारताने आता आर्थिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. ही प्रक्रिया आणखी गतीमान करणे आणि युवकांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध व्हाव्या यासाठीच मी येत्या ९ एप्रिलपासून तीन देशांच्या दौर्‍यावर जात आहे, असे पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
दौर्‍याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्सला भेट देणार आहे. उभय देशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढविण्यावर माझा भर राहणार आहे. पॅरिसबाहेरील अतिशय प्रगत अशा उद्योगांनाही मी भेट देणार आहे. दुसर्‍या टप्प्यात जर्मनीला जाणार असून, तिथे मी पंतप्रधान ऍन्जेला मर्केल यांची भेट घेणार आहे. भारताची संयुक्त भागीदारी असलेल्या एका महोत्सवाचे उद्‌घाटनही मी करणार आहे. त्यानंतर मी कॅनडाला जाणार आहे. आठ दिवसांच्या तीन देशांची दौर्‍याची सांगता कॅनडात होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21811

Posted by on Mar 29 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1831 of 2453 articles)


=संधीचे सोने करून दाखवा : अरुण जेटली यांचा सल्ला= वाराणसी, [२८ मार्च] - आम आदमी पार्टीत सध्या जो अंतर्गत कलह ...

×