Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » लखवी, हाफिझवरील कारवाई केवळ देखावा

लखवी, हाफिझवरील कारवाई केवळ देखावा

=पुण्यातील कमांड मुख्यालय उडविणार होतो: डेव्हिड हेडलीचा नवा गौप्यस्फोट=
David-Headley 26-11मुंबई, [१३ फेब्रुवारी] – मुंबईतील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यातील लष्कराच्या नॉर्दर्न कमांडच्या मुख्यालयावर मोठा हल्ला करण्याची आमची योजना होती. त्यासाठी मी पुण्याला भेटही दिली होती, असा नवा गौप्यस्फोट मुंबई हल्ल्याचा एक सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडली याने आज शनिवारी केला.
सलग पाचव्या दिवशीही अमेरिकेतील अज्ञात ठिकाणाहून मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपली साक्ष नोंदविताना हेडली म्हणाला की, मुंबई हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर पाकिस्तान सरकारने झकिऊर रेहमान लखवी आणि हाफिझ सईद यासारख्या अतिरेकी नेत्यांविरोधात जी कारवाई केली, ती केवळ एक देखावा होती. लखवी आणि हाफिझचे पाक सरकार काहीच वाकडे करू शकत नाही, असे मला माझ्या म्होरक्यांतर्फे आधीच स्पष्ट करण्यात आले होते.
अल् कायदाचा नेता असलेल्या इलायस काश्मिरी आणि आयएसआयमधील माझा म्होरक्या मेजर इक्बालच्या आदेशावरून मार्च २००९ मध्ये मी पुष्कर, पुणे आणि गोवा या शहरांना भेट दिली होती. या तिन्ही शहरांमधील महत्त्वाच्या ठिकाणांची व्हिडिओग्राफी केल्यानंतर पुण्यातील लष्कराच्या कमांड मुख्यालयाची बारकाईने पाहणी केली. या मुख्यालयातील काही कर्मचार्‍यांना आयएसआयमध्ये भरती करून, त्यांच्या माध्यमातून लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती प्राप्त करण्यासाठी मी प्रयत्न करावा, अशी इक्बालची इच्छा होती, असेही तो म्हणाला.
मुंबई हल्ल्यानंतर पाक सरकारने लखवी आणि हाफिझविरुद्ध कारवाई सुरू केली. याबाबत मी तोयबातील माझा हॅण्डलर साजिद मिरला विचारणा केली असता, ही कारवाई केवळ एक देखावा असून, ते दोघेही सुरक्षित आहेत. पाक सरकार त्यांना काहीच करणार नाही. केवळ भारतासह जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी कारवाईचा प्रकार सुरू आहे, असे साजिदने मला सांगितले होते. पाक लष्करातील मेजर अब्दुल रेहमान पाशा यानेही मला अशाच प्रकारची माहिती दिली होती. मुंबई हल्ल्याला इतकी वर्षे लोटूनही लखवी आणि हाफिज मोकळे आहेत, हा त्याचाच पुरावा आहे, असेही हेडलीने सांगितले.
३ जुलै २००९ ते ११ सप्टेंबर २००९ या काळात साजिद मिर आणि माझ्यात ई-मेलचा सातत्याने व्यवहार झाला. तोयबाचे सर्वोच्च नेते खरोखरच सुरक्षित आहेत काय, हा प्रश्‍न मी त्याला वारंवार विचारला होता आणि त्या प्रत्येक वेळी त्याने एकसारखेच उत्तर दिले होते. लखवीला पाक सरकारच्या आदेशानुसार तुरुंगात ठेवण्यात आले असले, तरी तिथे त्याला सर्वच प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. तो अगदी मजेत आहे, असेही साजिदने मला सांगितल्याचे तो म्हणाला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26843

Posted by on Feb 14 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (824 of 2453 articles)


=आयबीच्या माजी अधिकार्‍याचा दावा= नवी दिल्ली, [१३ फेब्रुवारी] - पाकधार्जिण्या लष्कर-ए-तोयबाची महिला बॉम्ब असलेल्या इशरत जहॉंविषयी पूर्वीच्या संपुआ सरकारला परिपूर्ण ...

×