Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » लडाखमध्ये चीनचे अवैध टॉवर जमीनदोस्त

लडाखमध्ये चीनचे अवैध टॉवर जमीनदोस्त

=भारतीय सैनिकांचा दणका, सीमेवर तणाव=
The Chinese tower in ladakhनवी दिल्ली, [१२ सप्टेंबर] – लडाखमधील नियंत्रण रेषेवर चीनने उभारलेले अवैध वॉच टॉवर भारतीय सैनिकांनी जमीनदोस्त केले असून, यामुळे भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
भारतीय लष्कराने केलेल्या कणखर कारवाईनंतर सीमेच्या दोन्ही बाजूंना सैनिकांची जमवाजमव सुरू असल्याचे वृत्त आहे. याबाबत प्राप्त झालेल्या वृत्तानुसार पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थातच चिनी सैनिक लडाखच्या देसपांगमधील बुर्तसे भागातील नियंत्रण रेषेवर हे वॉच टॉवर उभारत होते. नियंत्रण रेषेच्या जवळ कोणतेही बांधकाम न करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली असतानाही चिनी सैनिक टॉवर उभारण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे भारतीय लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांनी संयुक्तपणे चीनचे हे टॉवर जमीनदोस्त केले. यामुळे चिनी सैनिक संतापले आहेत आणि यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.
चीनने उत्तर लडाखच्या देसपांग क्षेत्रातील बुर्तसे भागावर आपला अधिकार असल्याचा दावा केला आहे. परंतु, भारताने चीनचा हा दावा स्पष्टपणे खोडून काढला आहे. पाकव्याप्त काश्मीरला लागून असलेल्या ज्या भागावर चीनने अवैधपणे कब्जा केला आहे, त्यावर देखरेख ठेवणे भारतीय लष्कराला या भागातून सहज शक्य होते. याशिवाय येथून जवळच असलेल्या दौलतबेग ओल्डी येथे भारतीय वायुसेनेचा तळ आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये हा तळ कार्यान्वित झाला. वायुसेनेचे सी-१३० जे सुपर हर्क्युलस हे महाकाय मालवाहू विमान समुद्रसपाटीपासून १६६१४ फूट उंचीवर असलेल्या या धावपट्टीवर उतरले होते.
लष्कराकडून खंडन
दरम्यान, भारत आणि चिनी सैनिकांमध्ये लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाल्याच्या वृत्ताचे भारतीय लष्कराने खंडन केले आहे. अशाप्रकारचा तणाव निर्माण झाल्याचे कोणतेही वृत्त आमच्याकडे नाही, असे लष्कराच्या एका अधिकार्‍याने नाव उघड न करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23777

Posted by on Sep 13 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1481 of 2453 articles)


४० खासदारांनी रोखला देशाचा विकास कॉंगे्रसला जनता माफ करणार नाही पंतप्रधानांचा जोरदार प्रहार चंदीगड, [११ सप्टेंबर] - सत्ता गेल्याचे ...

×