Home » ठळक बातम्या, विदर्भ » लव्ह जिहाद : आणखी एक युवती बळी!

लव्ह जिहाद : आणखी एक युवती बळी!

=जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न फसला, लॉजमध्ये डांबून लैंगिक शोषण=
अमरावती, (४ मे) – विशिष्ट समुदायातील युवक दुसर्‍या समुदायातील युवतींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना ‘लव्ह जिहाद’चा बळी देण्याचा डाव रचत आहे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सतत सुरू आहे. याच शृंखलेतील एक उदाहरण अंजनगावसुर्जी शहरात नुकतेच घडले असून पोलिसांनी आरोपीला अटकसुध्दा केली आहे.
धारणी तालुक्यातील सेमाडोह येथील २० वर्षीय युवती अंजनगावसुर्जी येथील नरसिंग महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. याच परिसरामध्ये असलेल्या मोबाईल रिचार्जच्या दुकानातून ती रिचार्ज करीत होती. दरवेळी युवती एकटीच दुकानामध्ये येत असल्याने २७ वर्षीय दुकानमालक आलीम खान जमाल खान याने या युवतीशी मैत्री करून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अलीम खान हा विवाहित असून त्याला दोन अपत्ये आहेत. तोसुद्धा मेळघाटातीलच हरिसाल गावाचा रहिवासी आहे. आपल्या विवाहाबाबत कुठलीही माहिती न होऊ देता त्याने या युवतीशी मैत्री करून वारंवार तिला भेटणे, तिच्या मोबाईलमध्ये रिचार्ज करून देणे, भेटवस्तू देणे असा प्रकार सुरू ठेवला. एप्रिल महिन्यात परीक्षा असल्याने युवती आपल्या आईसोबत अंजनगाव येथे राहायला आली होती. २३ एप्रिल रोजी अलीम खान याने तिला महाविद्यालयासमोर गाठून बाहेर फिरवण्यास नेण्याचे कारण सांगून पळवून नेले. आपली मुलगी घरी परत न आल्याने युवतीच्या आईने महाविद्यालयात तिची चौकशी केली. यावेळी आपली मुलगी अलीम खानसोबत बाहेर गेल्याचे समजताच युवतीच्या आईने अंजनगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अलीम खानचा शोध घेतला. मात्र तो युवतीला घेऊन कधी अकोट, कधी अकोला तर कधी मुंबई असा फिरत होता. यादरम्यान त्याने तब्बल दहा ते पंधरा दिवस या युवतीचे बळजबरीने लैंगिक शोषण केले. अलीम हा विवाहित असून त्याला दोन अपत्ये असल्याचे याच कालावधीत युवतीच्या लक्षात आले. बरेचदा युवतीने त्याच्या तावडीतून आपली सुटका करवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती अपयशी ठरली.
अखेर अलीमने युवतीला खंडवा येथील शारदा लॉजवर आणले. तेथीलच एका काजीच्या माध्यमातून युवतीसोबत निकाह करण्याची बळजबरी केली. यावेळी युवतीने विवाहास नकार दिला असता तिला जिवे मारण्याची धमकी दिली व काजीनेही तिच्यावर लग्न करण्याचा दबाव आणला. याच दरम्यान अंजनगाव, चिखलदरा व धारणी पोलिस अलीमच्या मागावर होते. त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी खंडवा येथील शारदा लॉजवर धाड टाकून संबंधित युवतीला ताब्यात घेऊन आरोपी अलीमला अटक केली.
युवतीने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. या युवतीचे एका उच्चभ्रू परिवारामध्ये लग्न जुळले होते. मात्र, ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्याने तिच्या भवितव्यावर मोठा आघात झाला आहे. या प्रकरणात ग्रामीण पोलिस अधीक्षक एस वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर गोविंद मडावी, अंजनगावचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश उपासे व त्यांच्या सहकार्‍यांनी तपास केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=12950

Posted by on May 4 2014. Filed under ठळक बातम्या, विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विदर्भ (2427 of 2455 articles)


=गडकरी, पटेल, वासनिक, मोघे, देवतळे, अहिर यांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद= नागपूर, (१० एप्रिल) - विदर्भातील लोकसभेच्या १० जागांसाठी आज उत्साही ...

×