Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » लष्कराच्या गोपनीय मोहिमेवर होते पुरोहित

लष्कराच्या गोपनीय मोहिमेवर होते पुरोहित

=मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला नवे वळण, कॉंगे्रस व संपुआ तोंडघशी=
cornal purohitनवी दिल्ली, [२३ एप्रिल] – मालेगाव बॉम्बस्फोटात हिंदू संघटनांचा हात असल्याचा आरोप करणारा कॉंगे्रस पक्ष आणि याआधीचे संपुआ सरकार अक्षरश: तोंडघशी पडले आहे. मालेगाव स्फोटात ज्या लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर दहशतवादी होण्याचा आरोप कॉंगे्रसप्रणीत संपुआने ठेवला होता, ते पुरोहित लष्कराच्या गोपनीय मोहिमेवर होते आणि दहशतवादी गटांमध्ये घुसखोरी करून त्यांच्या हालचालींची माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. विशेष म्हणजे, लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांसोबतच तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही पुरोहित यांच्या मिशनबद्दल कल्पना होती, असे धक्कादायक सत्य आता समोर आले आहे.
एका वृत्तवाहिनीला याबाबतचे दस्तावेजीय पुरावे मिळाले आहेत. मालेगाव प्रकरणात मी निर्दोष असल्याने ते सिद्ध करण्यासाठी लष्कराने आवश्यक ते दस्तावेज आपल्याला उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती पुरोहित यांनी अनेकदा केली होती. सुशीलकुमार शिंदे यांनाही त्यांनी याच संदर्भात पत्र लिहिले होते. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता. त्यानंतर पुरोहित यांनी अलीकडेच संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहिले. त्यावर तातडीने कारवाई करताना पर्रीकर यांनी आवश्यक ते दस्तावेज पुरोहित यांना देण्याचे निर्देश लष्कराला दिले. या दस्तावेजांच्या काही प्रती वृत्तवाहिनीला मिळाल्या आहेत. यावरून पुरोहित लष्करी गुप्तचर यंत्रणेकरिता काम करीत होते, हे स्पष्ट झाले आहे.
लेफ्ट. कर्नल पुरोहित ज्या गोपनीय मोहिमेवर होते, त्याची परिपूर्ण माहिती लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांना होती. अतिरेकी गटांमध्ये घुसखोरी करायचे व महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त करून लष्करी गुप्तचर यंत्रणेला द्यायचे. पुरोहित यांनी आतापर्यंत जे काही कार्य केले, त्याची दहशतवादविरोधी पथकानेही प्रचंड स्तुती केली आहे. इंडियन मुजाहिदीन व सिमी यासह अनेक अतिरेकी गटांमध्ये प्रवेश करून त्यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे, असे पुरोहित यांच्या वकील नीला गोखले यांनी हे दस्तावेज सर्वोच्च न्यायालयात सादर करताना सांगितले.
लष्कराच्या या गोपनीय मोहिमेवर काम करण्याची पुरोहित यांची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वीही त्यांनी अनेकदा अशा मोहीम यशस्वी केल्या होत्या. मालेगाव स्फोट प्रकरणी अटक झाल्यानंतर मोहिमेच्या गोपनीयतेमुळे त्यांनी न्यायालयात मौन धारण केले होते, असा युक्तिवादही त्यांच्या वकिलाने केला.
समझौता एक्सप्रेस स्फोटातही सहभाग नव्हता
मालेगाव स्फोटाप्रमाणेच समझौता एक्सप्रेसमधील स्फोटातही मला गोवण्यात आले आहे. पण, या स्फोटात पाकधार्जिण्या लष्कर-ए-तोयबाचा हात होता. याबाबतचे पुरावे मिळाल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएचे एक पथक अमेरिकेलाही गेले होते. मी देशाची सेवा करीत असतानाही गेल्या आठ वर्षांपासून खोट्या प्रकरणांमध्ये कारागृहात बंद आहे, मला देशद्रोही ठरविण्यात आले. आता सत्य समोर आले असल्याने मला माझा सन्मान परत मिळावा, अशी विनंतीही पुरोहित यांनी मनोहर पर्रीकर यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.
सुशीलकुमारांनाही लिहिले होते पत्र
लेफ्ट. कर्नल पुरोहित यांनी २०१४ मध्ये तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही नऊ पानांचे पत्र लिहून सत्यता विशद केली होती. पण, शिंदे यांनी या प्रकरणी काहीच कारवाई केली नव्हती, हे विशेष!

Short URL: https://vrittabharati.in/?p=27978

Posted by on Apr 24 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (443 of 2453 articles)


=देशभरातच जलसंकट= नवी दिल्ली, [२३ एप्रिल] - पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य केवळ महाराष्ट्र व कर्नाटकातच नसून, देशाच्या सर्वच भागांमध्ये पाण्यासाठी पायपीट ...

×