Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » लष्कराच्या संख्येत कपात करण्याचे संरक्षणमंत्र्यांचे संकेत

लष्कराच्या संख्येत कपात करण्याचे संरक्षणमंत्र्यांचे संकेत

manohar-parrikar1नवी दिल्ली, [५ मार्च] – संरक्षण खर्च कमी करण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कराच्या संख्येत काही प्रमाणात कपात करण्याचे संकेत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी दिले. लष्कराच्या संख्येत कपात करताना देशाच्या सुरक्षेशी मात्र कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना पर्रीकर म्हणाले की, भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये कपात करण्याची गरज आहे, मात्र याची सुरुवात लष्करापासून केली जाईल. लष्कराच्या कोणकोणत्या शाखेतील कर्मचारी कमी करता येतील, याचा आढावा घ्यायला लष्कराला सांगितले आहे. हे काम घाईगर्दीने होणारे नाही, यासाठी वेळ लागू शकतो. मात्र, ही कपात किती प्रमाणात होईल आणि कधीपासून होईल, ते पर्रिकर यांनी सांगितले नाही.
लष्करातील अनावश्यक कर्मचार्‍यांची संख्या कमी केली जाईल, मात्र ज्याठिकाणी आवश्यक आहे, तेथील कर्मचार्‍यांच्या संख्येत कपात केली जाणार नाही, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
भारतीय लष्करात स्थलसेना, वायुसेना आणि नौदल मिळून १३ लाख अधिकारी आणि जवान आहेत. संख्येच्या बाबतीत भारतीय लष्कर जगात तिसर्‍या स्थानावर आहे. वेतन आणि निवृत्तीवेतनामुळे लष्करावर मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण पडत आहे. लष्करी जवान आणि अधिकार्‍यांच्या पगारावर ९५ हजार कोटी, तर निवृत्तीवेतनावर ८२ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात. निवृत्त लष्करी अधिकारी आणि जवानांना समान पद समान निवृत्तीवेतन देण्याच्या निर्णयामुळे केंद्र सरकारवरचा आर्थिक भुर्दंड वाढला आहे.
वेतन आणि निवृत्तीवेतनावरचा खर्च दरवर्षी वाढत असल्यामुळे लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी पैसा कमी पडत आहे. यावर्षी अर्थसंकल्पात लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी ८० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीपेक्षा ही तरतूद १४ हजार कोटींनी कमी आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27032

Posted by on Mar 6 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (763 of 2453 articles)


=फेरविचार करण्याची पंतप्रधानांची सूचना= नवी दिल्ली, [५ मार्च] - कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीमधील (ईपीएफ) काही पैसा काढण्याची मुभा देतानाच त्यावर कर ...

×