Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » लष्करातील श्वानांना सेवानिवृत्तीनंतरही जगता येणार

लष्करातील श्वानांना सेवानिवृत्तीनंतरही जगता येणार

Indian-Army-Dogs1बरेली, [२१ जानेवारी] – लष्करी पथकातील श्वानांना आतापर्यंत सेवनिवृत्तीनंतर इंजेक्शन देऊन मारले जात होते. आता मात्र या श्वानांना सेवानिवृत्तीनंतरही आपले संपूर्ण जीवन जगता येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने या श्वानांना संपूर्ण जगण्याचा अधिकार दिला आहे.
दिल्लीचे वकील संजय कुमार यांनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशानंतर सेवानिवृत्त श्वानांची राहण्याची तसेच खाण्यापिण्याची योग्य ती काळजी घेतली जाणार आहे.
यापूर्वी लष्करी नियमानुसार लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या कुत्र्यांना ठार केले जात होते. याविरोधातील याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती टीएस ठाकूर आणि न्यायमूर्ती जयंती नाथ यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत श्वानांना न मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, लष्करी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करात श्वान दहा ते साडेदहा वर्षे तर घोडे हे २० ते २५ वर्ष काम करू शकतात. त्यानंतर ते सेवानिवृत्त होतात.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26619

Posted by on Jan 22 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (881 of 2453 articles)


=रेहमान मलिक यांचा आरोप= पेशावर, [२१ जानेवारी] - पेशावरच्या बाचा खान विद्यापीठावरील हल्ल्यात भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा हात ...

×