Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » लष्कराला मिळाले ६१६ अधिकारी

लष्कराला मिळाले ६१६ अधिकारी

Army officersडेहराडून, [१३ जून] – येथील प्रतिष्ठेच्या भारतीय लष्करी अकादमीतील शानदार ‘पासिंग आऊट परेड’नंतर ६१६ उमेदवारांचा भारतीय लष्करात अधिकारी म्हणून समावेश करण्यात आला. यात उत्तरप्रदेशातील सर्वाधिक शंभर उमेदवारांचा समावेश आहे.
नौदलप्रमुख ऍडमिरल आर. के. धोवन यांनी या परेडची पाहणी केली. येथील ऐतिहासिक ड्रील स्क्वेअर येथे अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही परेड पार पडली. या पासिंग आऊट परेडमध्ये एकूण ६८७ उमेदवार सहभागी झाले होते. यातील याच अकादमीतून पदवीधर झालेल्या ७१ विदेशी उमेदवारांचा समावेश असून, त्यात अफगाणिस्तानचे ४४, तजाकिस्तानचे १२ आणि भूतानच्या चौघांचा समावेश आहे.
लष्करात अधिकारी म्हणून सहभागी झालेल्या ६१६ भारतीय उमेदवारांमध्ये उत्तरप्रदेशातील १००, हरयाणातील ६४, उत्तराखंडमधील ६० आणि बिहारमधील ५१ जणांचा समावेश आहे. ऍडमिरल धोवन यांनी सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन केले. प्रशिक्षणाचा सर्वोच्च दर्जा नेहमीच जोपासणार्‍या देशातील अव्वल अकादमीतून तुम्ही सर्व पदवीधर झाला आहात. येथे तुम्ही जे काही शिकले, त्याचा देशसेवेसाठीच उपयोग करायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, आजवरच्या प्रशिक्षण कालावधीत सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ठरलेल्या इशान सिंगल याला ‘सॉर्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. अजय कुमार पाठकला सुवर्ण, तर आशीष कपूर, अंशुमन बिष्ट आणि अली शरीफ यांना रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22861

Posted by on Jun 14 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1624 of 2453 articles)


=मॅगीवरील बंदी कायम= मुंबई, [१२ जून] - नेस्ले कंपनीच्या मॅगीमध्ये एमसीजी व शिसे हे घातक पदार्थ आढळल्याने मॅगीच्या अनेक उत्पादनांवर ...

×