Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » लाखो हेक्टर जमीन हडपली, त्याचे काय?

लाखो हेक्टर जमीन हडपली, त्याचे काय?

=तुमच्या एक इंचाची फूटपट्टी किती मोठी : व्यंकय्या नायडू यांचा राहुल गांधींना सवाल=
Venkaiah-Naidu1नवी दिल्ली, [२२ सप्टेंबर] – देशावर तब्बल ६० वर्षे सत्ता गाजविताना देशभरातील शेतकर्‍यांना कुठलीही नुकसान भरपाई न देता आणि सामाजिक परिणामांचा विचार न करता, त्यांची लाखो हेक्टर जमीन हडपली, याचा हिशेब देणार आहात काय, असा सवाल केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आज मंगळवारी कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातीलच नव्हे, तर विदेशातीलही सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ होत असल्यानेच हा सर्व जळफळाट सुरू आहे, याची आम्हाला चांगलीच जाणीव आहे. तेव्हा, मोदी यांच्या लोकप्रियतेसाठी आम्हाला तुमच्या प्रमाणपत्राची गरजच नाही, असा टोलाही नायडू यांनी येथे एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना हाणला.
या देशावर तुमची जेव्हा सत्ता होती, त्या काळात तुमच्या प्रत्येकच सरकारने शेतकर्‍यांच्या लाखो हेक्टर जमिनी घशात टाकल्या आहेत. त्यावेळी त्यांना जमिनीचा चार पट मोबदला तुम्ही दिला होता काय, तुमच्या मनमानी धोरणामुळे समाजावर होणार्‍या परिणामांचा विचार केला होता?, असा सवालही नायडू यांनी केला.
कॉंगे्रसचे उपाध्यक्ष म्हणतात की, आम्ही नरेंद्र मोदी यांना शेतकर्‍यांची एक इंचही जमीन बळकावू देणार नाही. त्यामुळे कॉंगे्रसच्या एक इंचाची फूटपट्टी किती मोठी आहे, हेदेखील त्यांनी सांगून टाकावे. तुम्ही किती हेक्टर जमिनी बळकावल्या आहेत, याचे ठोस पुरावे आम्ही सादर केले आहेत. हरयाणा, आंध्रप्रदेशातील शेतकरी आजही तुमच्या नावाने शिव्या देत आहेत. आता तुम्हीच आम्हाला धमक्या देत आहात, अशा शब्दात नायडू यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढविला.
कॉंगे्रससाठी भूसंपादनाचा हा मुद्दा म्हणजे, ‘सौ चुहें खाके बिल्ली चली हज को’ असाच झालेला आहे, असा टोला हाणताना, सर्वसामान्य नागरिकांची विशेषत: शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचे प्रकार कॉंगे्रसने आता थांबवावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24004

Posted by on Sep 23 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1422 of 2453 articles)


=चांगल्या पावसाने साठ्यात वाढ, पाणी टंचाईचे सावट दूर= मुंबई, [२२ सप्टेंबर] - गेल्या काही दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस ...

×