Home » ठळक बातम्या, मराठवाडा » लातूरला दररोज एक कोटी लीटर पाणी : खडसे

लातूरला दररोज एक कोटी लीटर पाणी : खडसे

EKNATH KHADSE7लातूर, [१६ एप्रिल] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्वच मंडळी लातूर शहराच्या पाणीटंचाईबाबत लक्ष घालत असून, राज्य सरकार या बाबत गंभीर आहे. लातूरकरांना चार दिवसांनंतर दररोज एक कोटी लीटर पाणी उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती महसूल व पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. खडसे शुक्रवारी लातूरच्या दौर्‍यावर आले होते. औसा तालुक्यातील मातोळा ही दहाखेडी पाणीपुरवठा योजना त्यांनी नव्याने सुरू केली. त्याचे उद्घाटन बेलकुंड जलकुंभावर खडसे यांच्या हस्ते झाले. ही योजना सुरू करण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून नागपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी काम करीत होते. या कामाची माहिती कोणालाही देण्यात आली नव्हती. या योजनेचे रोहित्र व पंप नादुरुस्त झाले होते. ते नव्याने बसवण्यात आले.
निम्नतेरणा प्रकल्पातून दररोज ५० लाख लटर पाणी लातूरला उपलब्ध होणार आहे. हे पाणी थोड्याच दिवसांत बेलकुंडहून लातूपर्यंत बंद वाहिनीद्वारे २० लाख लीटर आणले जाईल व ३० लाख लीटर पाणी टँकरद्वारे उचलले जाणार आहे. सध्या डोंगरगाव येथून रोज २५ लाख लीटर, भंडारवाडी येथून सहा लाख लीटर, साई येथून दोन लाख लीटर व सोमवारपासून रेल्वेने दररोज २५ लाख लीटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लातूरकरांना एक कोटी लीटर पाणी दररोज उपलब्ध होणार असून, पावसाळ्यापर्यंत यात खंड पडणार नसल्याचे खडसे यांनी सांगितले.
रेल्वेने पाणी देण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मोठी भूमिका बजावली असून, अतिशय कमी पैसे राज्य सरकारला यावर खर्च करावे लागणार आहेत. लातूरला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असून लातूरचा पाणीप्रश्‍न कायमचा सोडवण्याचा शब्द आपण पाळणार असल्याचे ते म्हणाले. संपूर्ण मराठवाड्यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. २ हजार ८५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ५ हजार ९४४ विंधणविहिरी अधिग्रहित केल्या आहेत. ३५६ चारा छावण्या सुरू असून याची संख्या ३७३ पर्यंत पोहोचेल. सध्या तीन लाख ७२ हजार ८८१ जनावरे या छावणीत आहेत. गरज पडल्यास बाहेरच्या जिल्ह्यातून चारा उपलब्ध केला जाईल. जिल्हाधिकार्‍यांना निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मराठवाडयात दुष्काळाचे संकट निवारण्यास सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही खडसे यांनी दिली. लातूर शहरातील पाणी वितरणातील दोष दूर करण्यासाठी महापालिका व जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27840

Posted by on Apr 17 2016. Filed under ठळक बातम्या, मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मराठवाडा (484 of 2454 articles)


औरंगाबाद, [१६ एप्रिल] - मराठवाड्यातील दुष्काळाच्या झळा आता अधिकच तीव्र होत असून रोजगार आणि उदरनिर्वाहासाठी तेथील शेतकरी आणि मजूर वर्ग ...

×