Home » ठळक बातम्या, मराठवाडा » लातूर -उस्मानाबाद परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

लातूर -उस्मानाबाद परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

Osmanabad districtलामजना, [१९ डिसेंबर] – लातूर – उस्मानाबाद जिल्हयांतील सीमेवरील किल्लारीसह लामजना, खरोसा, मंगरूळ, गुबाळ,लिंबाळा बाणेगावसह परिसरातील अनेक गावांना गुरूवारी रात्री ९.४२ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे.
भूकंपाच्या भीतीने आणि घरातील भांडयांच्या आवाजामुळे घरांतील लोक रस्त्यावर धावत आले,सर्वत्र धावपळ सुरू झाली. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाक्षी संपर्क साधला असता, भूकंप मापक यंत्रावर नोंद झाली नसल्यामुळे हा भूकंप नसून गूढ आवाज असल्याचे उपजिल्हाधिकारी सुनील यादव यांनी सांगितले.
दरम्यान, उमरगा तालुक्यातील अनेक गावांना गुरूवारी रात्री ९ वाजून ४१ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. प्रांरभी जमिनीतून आवाज येत पत्रे हादरल्याचे जाणवले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. या संदर्भात तहसीलदार उत्तमराव सबनीस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचे सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19117

Posted by on Dec 20 2014. Filed under ठळक बातम्या, मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मराठवाडा (2316 of 2454 articles)


=‘जल’ या चित्रपटाचेही नामांकन= नवी दिल्ली, [१५ डिसेंबर] - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘जल’ हा हिंदी चित्रपट आणि याआधी दोनवेळा ऑस्कर ...

×