Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » लालकृष्ण अडवाणी यांना पत्नीशोक

लालकृष्ण अडवाणी यांना पत्नीशोक

kamla-advaniनवी दिल्ली, [६ एप्रिल] – माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या पत्नी श्रीमती कमला अडवाणी यांचे आज बुधवारी सायंकाळी हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे पती, मुलगा जयंत, मुलगी प्रतिभा आणि मोठा आप्तपरिवार आहे. कमला अडवाणी यांच्या निधनाने भाजपा वर्तुळात शोककळा पसरली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. आज दुपारी कमला अडवाणी यांच्या छातीत दुखायला लागले, त्यांनी घरातील सदस्यांना याची माहिती देताच त्यांना तातडीने अ. भा. आयुर्विज्ञान संस्थानमध्ये (एम्स) दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी उपचाराची शर्थ केली, पण त्याला प्रतिसाद न देता त्यांची प्राणज्योत मावळली. निधनाच्या समयी त्यांच्यासोबत लालकृष्ण अडवाणी आणि कुटुंबीय होते. कमला अडवाणी यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एम्समध्ये धाव घेतली. गेल्या काही महिन्यांपासून कमला अडवाणी यांची प्रकृती चांगली नव्हती. त्या व्हीलचेअरवरच होत्या. विस्मरणाचाही त्यांना त्रास होता.
२५ फेब्रुवारी १९६५ रोजी कमला यांचा लालकृष्ण अडवाणी यांच्याशी विवाह झाला. २०१४ मध्ये त्यांच्या विवाहाला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा त्यांची मुलगी प्रतिभा यांनी आपल्या आई-वडिलांच्या विवाहाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला होता. कमला अडवाणी डाकखात्यात सेवेला होत्या. त्यांनी मुंबई आणि दिल्ली येथे काम केले होतेे. लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत कमला अडवाणी यांनी साथ दिली. प्रत्येक बर्‍या-वाईट प्रसंगात त्या अडवाणी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. एका अर्थाने त्या अडवाणी यांच्या राजकीय जीवनाच्या शिल्पकारच होत्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27738

Posted by on Apr 7 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (517 of 2453 articles)


=भाजपाचा स्थापना दिन उत्साहात साजरा= नवी दिल्ली, [६ एप्रिल] - नव्या कल्पना आणि विचारांनीच २१ व्या शतकात उद्‌भवणार्‍या आव्हानांचा आम्हाला ...

×