Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » लालकृष्ण अडवाणी लिहिणार आत्मचरित्र

लालकृष्ण अडवाणी लिहिणार आत्मचरित्र

=सहा दशकांचा राजकीय प्रवास रेखाटणार=
advani_l_kनवी दिल्ली, [१७ मे] – भारतीय राजकारणातील लोहपुरुष अशी ओळख असलेले आणि भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय राजकारणात मानाचे स्थान मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी आता आत्मचरित्र लिहिण्यात स्वत:ला व्यस्त करणार आहेत.
आयुष्याची सहा दशके राजकीय जीवनातून समाजसेवा करणारे आणि भाजपाला केंद्रात सत्तेवर आणण्यात मोठे योगदान देणारे लालकृष्ण अडवाणी आपल्या या आत्मचरित्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते पद्मविभूषण पुरस्काराने झालेला सन्मान हा तब्बल ६० वर्षांचा राजकीय प्रवास सादर करणार आहेत.
जनसंघाचे जनता पक्षात विलीनीकरण झाले. पण, पुढे राजकीय परिस्थिती बदलली आणि लालकृष्ण अडवाणी व अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. १९८४ मध्ये लोकसभेत केवळ दोन जागांवर स्थिरावलेल्या भाजपाचा विरोधी पक्ष म्हणून प्रवास आणि १९९० च्या दशकात केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपाने केलेली कामे याबाबतची माहितीही या पुस्तकात राहणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22596

Posted by on May 18 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1684 of 2453 articles)


=अखेर ४२ वर्षांचा संघर्ष थांबला !,= मुंबई, [१८ मे] - गेली ४२ वर्षे मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोमात असलेल्या परिचारिका अरुणा ...

×