Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » लालूंनीच ओढले, मी काय करू!

लालूंनीच ओढले, मी काय करू!

=केजरीवाल यांची सारवासारव=
lalu, kejriwalनवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात चारा घोटाळ्याचे सूत्रधार आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची गळाभेट घेतल्यानंतर वादात अडकलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, ‘लालूंनीच मला अचानक ओढले आणि मिठी मारली, अशा अवस्थेत त्यांची गळाभेट घेण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे नव्हताच,’ अशा शब्दात सारवासारव केली आहे.
लालूंची गळाभेट घेणे याचा अर्थ मी भ्रष्टाचाराचे समर्थन केले, असा मुळीच होत नाही. आम आदमी पार्टीने बिहार निवडणुकीत भाजपाविरोधात प्रचार करून जदयुचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीशकुमार यांचे समर्थन केले होते. नितीशकुमार हे अतिशय चांगले आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत, असे केजरीवाल म्हणाले.
नितीशकुमार यांचे निमंत्रण स्वीकारून मी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला गेलो. तिथे व्यासपीठावर लालूप्रसादही होते. मी तिथे जाताच हात पकडून त्यांनी मला जवळ ओढले आणि अलिंगन दिले. यानंतर त्यांनी माझा हात धरला आणि उंचावला. मला त्यांच्याशी मैत्री करायची नाही. त्यांच्या भ्रष्ट पार्श्‍वभूमीला माझा आधीपासूनच विरोध आहे आणि पुढेही तो कायम राहणार आहे, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
माझ्या आणि लालूंच्या भेटीबाबत प्रश्‍न विचारण्याचे मला समाधानच आहे. लोकांना आमच्याकडून अपेक्षा असल्याने आणि लोक आम्हाला इतरांपेक्षा वेगळे मानत असल्याने त्यांनी हा प्रश्‍न विचारायलाच हवा. अनेक राजकीय नेते लालूंशी हात मिळवतात, त्यांना अलिंगन देतात, पण तेव्हा हा प्रश्‍न कुणीच उपस्थित करीत नाही, असे सांगण्याचा विसरही त्यांना पडला नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25676

Posted by on Nov 24 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1170 of 2452 articles)


नवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] - पाटण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात राजद नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव ...

×