Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » लालूंनी बिहारच्या जनतेचा अपमान केला

लालूंनी बिहारच्या जनतेचा अपमान केला

=पंतप्रधानांची जोरदार टीका=
modi inमुंगेर, [८ ऑक्टोबर] – पाच टप्प्यांत होणार्‍या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२ ऑक्टोबरला होणार्‍या मतदानासाठी आता अवघे काही तास उरले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारपासून पुन्हा एकदा बिहारमध्ये प्रचाराचा झंझावात सुरू केला असून, हिंदूदेखील गोमांस खातात, असे वक्तव्य करणारे लालूप्रसाद यादव यांनी संपूर्ण बिहार आणि विशेष करून यदुवशींचा घोर अपमान केला आहे, अशी प्रखर टीका पंतप्रधानांनी केली.
मुंगेर येथे आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या घणाघाती भाषणात लालूप्रसाद यादव यांच्यासह ‘महास्वार्थी’ गठबंधन अर्थात जदयु आणि कॉंग्रेसचाही खरपूस समाचार घेतला. हिंदूही गोमांस खातात, असे वक्तव्य करून लालूंनी गोपालक असलेल्या यदुवंशी समुदायाचा घोर अपमान केला आहे. तुम्हाला सत्तेत येण्यासाठी याच यादव समुदायाने मोठी मदत केली होती, हे विसरू नका, असा टोलाही मोदींना लालूंना लगावला.
लालूंचा खरपूस समाचार घेताना मोदी म्हणाले की, लालू म्हणत आहेत, माझ्या शरीरात कुणीतरी सैतान घुसला होता आणि त्यानेच माझ्याकडून हे वदवून घेतले. परंतु, या सैतानाला लालूंचा पत्ता कुठून मिळाला, हे मला जाणून घ्यायचे आहे. ज्याप्रमाणे लोक आपल्या नातेवाईकांना ओळखतात त्याचप्रमाणे लालूंनी सैतानाला ओळखले, असे नरेंद्र मोदींनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आपण सैतानाच्या प्रभावाखाली तसे वक्तव्य केल्याचा लालूंचा दावा खोडून काढताना पंतप्रधान म्हणाले, आतापर्यंत आम्ही मानव असलेल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांशी लढत होतो. आता मात्र एक सैतान मनुष्याच्या शरीरात घुसला असून, तो आमच्या मागे लागला आहे. अशा लोकांच्या हाती तुम्ही बिहारची सत्ता सोपविणार का, असा सवाल मोदींनी उपस्थितांना करताच, प्रचंड संख्येत असलेल्या जनसमुदायातून नही…नही…असा आवाज ऐकू आला.
जयप्रकाश नारायण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पंतप्रधान मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरही घणाघाणी हल्ला चढविला. कधीकाळी स्वत:ला जेपींचे अनुयायी म्हणविणारे लोक आज ज्यांनी जेपींना तुरुंगात डांबले त्या कॉंग्रेसशी हातमिळवणी करत आहेत. म्हणूनच हे महागठबंधन नसून, ‘महास्वार्थबंधन’ आहे. कॉंग्रेसने देशावर आणिबाणी लादली आणि इतर अनेक जणांसह जेपींना कारागृहात डांबले आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांचे अकाली निधन झाले. आज त्याच कॉंग्रेसशी हातमिळवणी करणारे लोक, भाजपाला शिव्याशाप देत आहेत, असा टोला मोदींनी लगावला.
सध्या राजकीय वर्तुळात बिहारबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात असले तरी, राजकीय पंडितांना यावेळी आपली विचारसरणी बदलणे भाग पडणार आहे. ही अशी पहिली निवडणूक असेल ज्यामध्ये जातिपातीपेक्षा विकासाला प्राधान्य दिले जाईल. ही निवडणूक युवक आणि विकासाच्या मुद्यावरच लढली जाईल आणि हेच मुख्य केंद्रबिंदू असतील, असे पंतप्रधान म्हणाले. प्रख्यात हिंदी कवी रामधारीसिंह दिनकर यांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, ‘सिंहासन खाली करो, जनता आती है’, हे त्यांचे वाक्य बिहारच्या युवकांनी खूपच गांभीर्याने घेतले आहे आणि त्यांना आता बदल हवा आहे. पुन्हा जंगलराज आणून अपहरण आणि हत्यांचा उद्योग सुरू होण्याऐवजी भाजपाप्रणीत रालोआला पाठबळ द्या आणि विकासाच्या दृष्टीने उद्योगधंदे येऊ द्या, असे आवाहन मोदींनी या प्रचंड जाहीर सभेत केले. पंतप्रधान मोदी यांनी आज गुरुवारी आणखी तीन ठिकाणी सभा घेऊन भाजपाच्या प्रचारासाठी रान उठवून दिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25078

Posted by on Oct 10 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1351 of 2452 articles)


=अन्न पुरवठा मंत्र्याची हकालपट्टी, स्वच्छ प्रशासनाचा दावा फोल= नवी दिल्ली, [९ ऑक्टोबर] - आपल्या आम आदमी पार्टीत आणि सरकारमध्ये कुणीही ...

×