लिंग निर्धारणावरील जाहिराती थांबवा
Thursday, January 29th, 2015=सुप्रीम कोर्टाचे गुगल, याहू, मायक्रोसॉफ्टला आदेश=
नवी दिल्ली, [२८ जानेवारी] – गर्भातच लिंगनिर्धारण करण्यावरील जाहिराती तत्काळ थांबवा आणि भारतीय कायद्यांचे पालन करा, असा कडक आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी गुगल इंडिया, याहू इंडिया आणि मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड यासारख्या आघाडीच्या कंपन्यांना दिले आहेत.
या तीनपैकी कोणत्याही एका सर्च इंजिनवर अशा प्रकारची कोणतीही जाहिरात अस्तित्वात असेल, तर ती तत्काळ प्रभावाने काढण्यात यावी, असे न्या. दीपक मिश्रा आणि न्या. प्रफुल्ल सी. पंत यांचा समावेश असलेल्या दोन सदस्यीय न्यायासनाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. पीसी-पीएनडीटी कायद्याच्या कलम २२ मध्ये भारतात लिंगनिदानावर कायदेशीर बंदी असल्याने या कायद्याचे आम्ही उल्लंघन करणार नाही अशा कुठल्याही जाहिराती यापुढे प्रकाशित करणार नाही तसेच अशा जाहिरातींचे प्रायोजकत्वही स्वीकारणार नाही, अशा आशयाचे धोरणात्मक पेज आणि आपल्या सेवा शर्तीचे पेज अपलोड करण्याचे आदेशही न्यायालयाने या तिन्ही सर्च इंजिनला दिले आहेत.
भारतात या संदर्भात असलेल्या कायद्याचे पालन करा आणि अशा कुठल्याही जाहिराती सध्या तुमच्या पेजवर असतील, तर त्या तत्काळ प्रभावाने काढून टाका, असे न्यायालयाने म्हटले आहे. तत्पूर्वी, आपल्या युक्तिवादात गुगल आणि मायक्रोसॉफ्टने आम्ही पीसी-पीएनडीटी कायद्याचे कुठलेही उल्लंघन केले नसल्याचा दावा केला होता.
Short URL: https://vrittabharati.in/?p=20145

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!