Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » लेक्चरर होण्यासाठी नेट,सेट हीच किमान पात्रता

लेक्चरर होण्यासाठी नेट,सेट हीच किमान पात्रता

=सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा=
SupremeCourtनवी दिल्ली, [१९ मार्च] – सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयानुसार जर तुम्ही एनईटी (नेट) किंवा एसएलईटी परीक्षा उत्तीर्ण केली असेल तरच तुम्ही लेक्चरर होण्यासाठी पात्र आहात.
न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्यांच्याकडे एम. फिल. व पीएच. डी. पदवी आहे ते लेक्चरर होण्यासाठी पात्र नाहीत. न्या. टी. एस. ठाकूर आणि न्या. आर. एफ. नरिमन यांचा समावेश असलेल्या न्यायासनाने एम. फिल. व पीएच. डी. पदवीधारकांंनी दाखल केलेल्या याचिका खारिज करताना हा निर्णय दिला आहे. हा नियम पक्षपात करणारा आणि आमच्या समानतेच्या अधिकाराचे हनन करणारा आहे, असा याचिकाकर्त्यांचा दावा होता. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) नियम हे केंद्र सरकारच्या धोरणाला अनुरूपच असले पाहिजे. केंद्र सरकारने नियुक्तीचे उच्च मापदंड कायम ठेवण्यासाठी लेक्चरर व सहायक प्रोफेसर या पदासाठी राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) उत्तीर्ण करणे, ही किमान पात्रता निश्‍चित करण्यात आली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21597

Posted by on Mar 20 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1874 of 2453 articles)


=एलबीटी ऑगस्टपासून रद्द, राज्याचा अर्थसंकल्प सादर= मुंबई, [१८ मार्च] - ‘चांदा ते बांदा’ विकासाची गंगा सर्वत्र पोहोचविणारा महिला, शेतकरी, शेतमजूर, ...

×