Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » लेहमध्ये हिमस्खलन, जवान शहीद

लेहमध्ये हिमस्खलन, जवान शहीद

Army Jawans killed in a snow avalanche in Ladakhलेह, [२५ मार्च] – जम्मू-काश्मीरच्या लेहमधील तुर्तक येथे शुक्रवारी सकाळी हिमस्खलन झाल्यामुळे भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला असून, एक जण गंंभीर जखमी झाला.
संरक्षण विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे जवान नेहमीप्रमाणे सकाळी गस्त घालत असताना हिमस्खलन झाले आणि त्यात दोन जवान अडकले. याची माहिती मिळताच लष्कराने विशेष शोधमोहीम हाती घेतली. यावेळी एका जवानाला जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले. परंतु, उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता त्याने अखेरचा श्‍वास घेतला, असे लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रवक्ते कर्नल एस. डी. गोस्वामी यांनी सांगितले. लान्स हवालदार भवन तमांग, असे शहीद जवानाचे नाव आहे. तो पश्‍चिम बंगालच्या दार्जिलिंग तहसील अंतर्गत येणार्‍या लोपशु गावचा होता. बेपत्ता जवानाचा शोध सुरू आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27568

Posted by on Mar 26 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (575 of 2453 articles)


=अमरावती विभागातील ५,९०० गावांचा समावेश= मुंबई, [२५ मार्च] - राज्य शासनाने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेताना विदर्भातील १२ हजार गावांमध्ये ...

×