Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » लोकलची जुनी ‘ऊर्जा’ होणार इतिहासजमा

लोकलची जुनी ‘ऊर्जा’ होणार इतिहासजमा

mumbai-localमुंबई, [९ एप्रिल] – मुंबईकरांना गेल्या ९१ वर्षांपासून सेवा देणारी आणि त्यांच्या मनात घर करून बसणारी डीसी विद्युतप्रवाहावर धावणारी लोकल अखेर आज इतिहासजमा होणार आहे. डीसीवर चालणारी शेवटची लोकल आज रात्री ११.३० वाजता कुर्ला ते सीएसटी स्थानकांदरम्यान धावणार आहे.
पहिली डीसी लोकल ३ फेब्रुवारी १९२५ रोजी मुंबई ते कुर्ला स्थानकादरम्यान धावली होती. तेव्हापासून ही लोकल मुंबईकरांच्या धावपळीच्या जीवनातील एक महत्वाचा भाग होऊन गेली. आज या लोकलचा शेवटचा प्रवास आहे. विशेष म्हणजे या ऐतिहासिक प्रवासाचे होण्यासाठी प्रवाशांना तब्बल १० हजार रूपये मोजावे लागणार आहेत. तिकिटांची विक्री सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन डबे प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. शेवटच्या डीसी लोकलनं प्रवास करणार्‍या प्रवाशांना सीएसटी येथील खास दालनात डीसी ते एसी विद्युत परिवर्तनाच्या कामाचं थेट प्रक्षेपण दाखविण्यात येईल. दरम्यान, यातून जमा होणारा निधी राज्यातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27763

Posted by on Apr 9 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (506 of 2452 articles)


=सुप्रीम कोर्ट करणार सुनावणी= नवी दिल्ली, [८ एप्रिल] - ज्येष्ठ नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम स्थापन करण्याच्या ...

×