Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » लोकलवरील ताण कमी करण्यासाठी कार्यालयाच्या वेळा बदला

लोकलवरील ताण कमी करण्यासाठी कार्यालयाच्या वेळा बदला

=रेल्वेमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना=
suresh-prabhuमुंबई, [८ जानेवारी] – शहराची रक्तवाहिनी समजल्या जाणार्‍या लोकलवरील ताण कमी करण्यासाठी कामकाजाच्या वेळा बदलण्याची सूचना केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. ते मुंबईत बोलत होते.
सकाळी कामाच्या वेळेत लोकलमध्ये चढणे ही मुंबईकरांसाठी अग्निपरीक्षाच असते. पण, आता त्यावर खुद्द रेल्वेमंत्र्यांनीच उपाय सुचविला आहे. रेल्वेमंत्र्यांच्या या सूचनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. साधारण कार्यालयीन वेळ सकाळी १० ते ५ असते. नेमके याच वेळी लोकल गाड्यांना तुफान गर्दी असते. त्यामुळे लोकलवर प्रचंड भार येतो. हा भार कमी करायचा असेल तर कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदला, असे सूचनावजा आवाहन प्रभू यांनी केले आहे.
तसेच मुंबईतील प्रवाशांवरील ताण कमी करण्यासाठी सीएसटी ते पनवेल आणि चर्चगेट ते विरार ६ पदरी उन्नतमार्ग बांधण्याचे आश्‍वासन रेल्वेमंत्री प्रभू यांनी दिले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19498

Posted by on Jan 9 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (2274 of 2452 articles)


नवी दिल्ली, [६ जानेवारी] - माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना पद्म विभूषण या दुसर्‍या सर्वोच्च नागरी ...

×