Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » ‘वन रँक वन पेन्शन’ प्राधान्याने मार्गी लावा

‘वन रँक वन पेन्शन’ प्राधान्याने मार्गी लावा

=तरुण विजय यांचे पर्रिकरांना निवेदन=
tarun vijayनवी दिल्ली, [२६ फेब्रुवारी] – संरक्षण व्यवहाराविषयक संसदेच्या स्थायी समितीचे सदस्य असलेले भाजपा खासदार तरुण विजय यांनी आज गुरुवारी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली आणि लष्करासाठी असलेला ‘वन रँक वन पेन्शन’ हा मुद्दा प्राधान्याने मार्गी लावण्याची आणि जवानांच्याच बाजूने त्याचा निकाल लावण्याची विनंती केली. या मागणीवर सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याची ग्वाही पर्रिकर यांनी विजय यांना दिली.
‘वन रँक वन पेन्शन’ योजना राबविण्याकरिता निधीची कमतरता असल्याचे जर सरकारला वाटत असेल, तर खासदार आणि आमदारांना असलेला विशेषाधिकार काढून टाका आणि ‘वन रँक वन पेन्शन’ची लष्कराची बहुप्रतिक्षीत मागणी पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या निधीचा वापर करा, असेही तरुण विजय यांनी संरक्षण मंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जवान आपल्या प्राणांची बाजी लावून देशाची सेवा करतात. पण, निवृत्तीनंतर त्यांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागते. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात जगण्यासाठी त्यांना केवळ संघर्षच करावा लागतो. ‘वन रँक वन पेन्शन’ मुद्यावर संपुआ सरकारच्या काळात जवानांची फार मोठी निराशा झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडून त्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे हा प्रश्‍न शक्य तितक्या लवकर आणि जवानांच्या बाजूनेच निकाली काढण्यात यावा, अशी विनंती तरुण विजय यांनी केली.
यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पर्रिकर यांनी आपले म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेतले आणि लष्कराची ‘वन रँक वन पेन्शन’ ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली असल्याची माहिती दिली. संरक्षण मंत्री या नात्याने मी आपल्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण केल्या जातील, अशी हमी त्यांनी आपल्याला दिली आहे.
अपंगत्व काळातील पेन्शनशी संबंधित तीन हजारांवर प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. जवानांना २४ सप्टेंबर २०१२ पासून सुधारित निवृत्तीवेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे. पण, विविध संघटनांचे निवेदन प्राप्त होऊनही अपंगत्वाच्या काळात मिळणार्‍या निवृत्ती वेतनाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. केंद्रीय प्रशासकीय लवादानेही या प्रकरणी आपला निकाल दिला. पण, जवानांना कायद्याने मिळणारी थकबाकी नाकारण्यात आली होती, याकडेही तरुण विजय यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20878

Posted by on Feb 27 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2011 of 2453 articles)


चार पुरस्कार पटकावले एडी रेडमेन सर्वोत्कृष्ट अभिनेता, ज्युलियन मूर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लॉस एंजेलिस, [२३ फेब्रुवारी] - हॉलीवूडमधील अत्यंत प्रतिष्ठित ...

×