Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » वर्षपूर्तीनिमित्त मोदी सरकारचे जनकल्याण पर्व

वर्षपूर्तीनिमित्त मोदी सरकारचे जनकल्याण पर्व

=देशभरात १०० सभा करणार, पंतप्रधान, मंत्र्यांचे संबोधन=
narendra_modi11नवी दिल्ली, [१४ मे] – गेल्यावर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक जनादेशासह सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारला येत्या २६ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत असून, यानिमित्ताने देशात जलकल्याण पर्व साजरे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात १०० सभा घेण्यात येणार असून, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी या सभांना संबोधित करून सरकारने वर्षभरात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणार आहेत. हे पर्व साजरे करण्यासाठी एक कृती योजना आज गुरुवारी सादर करण्यात आली. त्यानुसार मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद म्हणून देशभरात जनकल्याण पर्व साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्त तहसील स्तरावरही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पत्रपरिषदा व प्रदर्शनांचे आयोजन करून सरकारचे काम व योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
यानिमित्त येत्या २६, २७ आणि २९ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, सर्व खासदार, आमदार, महापौर आणि राज्यस्तरावरील पदाधिकारी किमान तीन कार्यक्रम आयोजित करतील आणि सरकारच्या कामांची माहिती जनतेला देतील. भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारीदेखील या सभांना संबोधित करतील. यानिमित्त ३० आणि ३१ मे रोजी जनकल्याण मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल आणि पंतप्रधान सुरक्षा योजना, जीवन ज्योती योजना व अटल पेन्शन योजनेची माहिती लोकांना देण्यात येईल. याशिवाय नव्याने नोंदणी देखील केली जाईल. बॉलीवूड आणि छोट्या पडद्यावरील अनेक नामवंत कलाकारदेखील सरकारच्या या पर्वात सामील होऊन स्वच्छ भारत व सबका साथ, सबका विकास या संदेशाचा प्रसार, प्रचार करणार आहेत, अशी माहिती सूत्राने दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22554

Posted by on May 15 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1694 of 2453 articles)


=चीन भेटीपूर्वी पंतप्रधानांचा विश्‍वास= नवी दिल्ली, [१३ मे] - माझा चीन दौरा केवळ भारत आणि चीन या दोन देशांचे संबंध ...

×