Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » वर्षाकाठी दीड लाख किमी रस्ते बांधणार

वर्षाकाठी दीड लाख किमी रस्ते बांधणार

=नितीन गडकरी यांची माहिती=
Nitin-Gadkari1कोटा, [१६ ऑक्टोबर] – केंद्र सरकार देशात सध्या वर्षाकाठी ९६ हजार किलोमीटर इतक्या रस्त्यांची बांधणी करीत आहे. पण, आता दरवर्षी किमान दीड लाख किलोमीटरचे रस्ते बांधण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील भामशा मंडी मैदानावर गुरुवारी सायंकाळी जाहीर सभेला संबोधित करताना गडकरी बोलत होते. कोणत्याही देशाच्या विकासात रस्त्यांची भूमिका फार महत्त्वाची असते. ज्या देशात रस्त्यांचा होतो तिथे सर्वांगीण विकासाला चालना मिळते. त्या देशाला विकासाविषयी चिंता करण्याची गरजच नसते, असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
राजस्थानकरिता रस्ते आणि महामार्ग बांधणीच्या विविध प्रकल्पांचा प्रस्ताव सादर करताना गडकरी म्हणाले की, आपल्या सरकारने आतापर्यंत वर्षाकाठी ९६ हजार किलोमीटरच्या रस्त्यांचे बांधकाम केले आहे. आता यावर्षीपासून किमान दीड लाख किमी रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट आम्ही निर्धारित केले आहे. प्रत्येक गावाला मजबूत रस्त्याशी जोडण्याचा आमचा संकल्प आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या सत्ताकाळात सुरू केलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत देशातील सुमारे १.७० लाख गावांना मजबूत रस्त्यांशी जोडले आहे.
रस्ता आणि जल वाहतुकीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देताना, गडकरी म्हणाले की, देशात लवकरच वाहतुकीसाठी स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे देशाच्या विकासात मोठी मदत होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराज राजेदेखील उपस्थित होत्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25160

Posted by on Oct 17 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1328 of 2453 articles)


=मार्चअखेरपर्यंत योजना अंमलात येणार= नवी दिल्ली, [१६ ऑक्टोबर] - कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या (पीएफ) आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी कार्यालयात जा, कागदोपत्रांची ...

×