Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » वस्तूनिष्ठ बातम्यांना महत्त्व द्या

वस्तूनिष्ठ बातम्यांना महत्त्व द्या

=वृत्तवाहिन्यांचा महापूर, पण…. : अर्थमंत्री अरुण जेटली=
arun jaitley5नवी दिल्ली, [८ मे] – देशात वृत्तवाहिन्यांचा महापूर आलेला आहे. पण, वस्तुस्थितीवर आधारित घटना अजूनही दाखवल्या जात नाहीत. बातम्या दाखविण्याची जबाबदारी प्रत्येकच वृत्तवाहिनीची आहे. मात्र, या बातम्या वस्तुनिष्ठ असाव्यात. वृत्तवाहिन्यांनी वस्तुनिष्ठ बातम्यांनाच महत्त्व द्यायला हवे, अशा शब्दात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वृत्तवाहिन्यांना फटकारले आहेत.
गुरुवारी दूरदर्शनचे ‘डीडी न्यूज मोबाईल ऍप’चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात जेटली बोलत होते. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून जास्तीत जास्त आणि वस्तुनिष्ठ बातम्यांचे संकलन करण्याचा प्रसार भारतीचा एकमेव उद्देश राहणार असल्याचे जेटली यांनी यावेळी स्पष्ट केले.
देशभरातच सध्या वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे अशा विविध माध्यमांतून बातम्यांचा महापूर वाहात असला, तरी लोकप्रियता वाढविण्याच्या दृष्टिने वृत्तवाहिन्या, निवेदक किंवा संपादकांना महत्त्वाच्या वाटतील त्याच विषयांच्या बातम्यांना महत्त्व दिले जाते. वस्तुनिष्ठ बातम्या एखाद्याच वेळी पाहायला किंवा वाचायला मिळतात. स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी निवेदकाकडून चालवल्या जाणार्‍या बातम्यांनाच महत्त्व दिल जाते. एखाद्या घटनेचे वास्तव जाणून घेण्याचा कदाचितच प्रयत्न केला जातो, असे खेदजनक उद्‌गार काढताना, प्रसार भारती मात्र यास अपवाद असेल. वस्तुनिष्ठ हेच प्रसार भारतीचे मुख्य वैशिष्ट्य असेल, असे त्यांनी विश्‍वासाने सांगितले.
वृत्तवाहिन्यांच्या दर्शकांनी आपल्या सवयी बदलायला हव्यात. जग, राजकारण, अर्थव्यवस्था याविषयीची माहिती तसेच देशभरात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यावर त्यांनी भर द्यायला हवा. केवळ दिल्लीपुरते पाहून चालणार नाही. दिल्लीच्या बाहेरही बर्‍याच वस्तुनिष्ठ बातम्या आहेत. देशात सर्वत्र काय चालले आहे, याचा आढावा घेण्यासाठी काही मिनिटे बीबीसी, तर काही मिनिटे दूरदर्शन पाहिल्यावर मला तरी बर्‍यापैकी माहिती मिळते, असेही जेटली यांनी नमूद केले

Short URL: https://vrittabharati.in/?p=22441

Posted by on May 9 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1721 of 2453 articles)


=अमेरिकेतील तज्ज्ञांचे मत= वॉशिंग्टन, [६ मे] - गेल्या वर्षी १६ मे रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाप्रणीत रालोआ सरकार भारतात ...

×