वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत विजयी
Wednesday, April 15th, 2015मुंबई, [१५ एप्रिल] – वांद्रे (पूर्व) निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांचा विजय झाला असून नारायण राणे यांचा पराभव झाला आहे.
शिवसेना आमदार प्रकाश सावंत यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणुक झाली. ११ एप्रिलला झालेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर झाला आहे. शिवसेनेच्या तृप्ती सावंत जिंकल्यामुळे ‘मातोश्री’ च्या अंगणातील भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकला आहे.
चौदाव्या फेरीअखेर शिवसेनेच्या सावंत यांना सुमारे १७ हजारांची आघाडी मिळाली आहे. आज सकाळी ८ वाजता वांद्रे पूर्वच्या समाज मंदिर सभागृहात मतमोजणी सुरु झाली. मात्र तृप्ती सावंत या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. त्या शेवटपर्यंत आघाडीवर कायम होत्—या. जसजशी तृप्ती सावंत यांची आघाडी वाढत होती, तसा शिवसैनिकांचा जल्लोषही वाढत होता. एकूणच वांद्रे हा मतदार संघ आधीही शिवसेनेचा बालेकिल्लाच होता आणि आताही तो कायमच आहे हे या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=22109

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!