Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » वाघा सीमेवर फडकणार सर्वांत उंच तिरंगा

वाघा सीमेवर फडकणार सर्वांत उंच तिरंगा

=अमृतसर, लाहोरमधूनही दिसणार=
indian-flag--tirangaनवी दिल्ली, [२९ एप्रिल] – डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमांचे रक्षण करणार्‍या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) अटारी-वाघा येथील भारत-पाक सीमेवर देशातील सर्वांत उंच तिरंगा फडकविण्याचा निर्णय घेतला आहे.
वाघा सीमेवर होणार्‍या देखण्या रीट्रीट समारंभाच्या ठिकाणी असलेल्या प्रेक्षक दीर्घेचा विस्तार करण्याच्या बीएसएफच्या योजनेचा भाग म्हणून हा ३५० फूट उंच तिरंगा फडकविण्यात येणार आहे. हा सर्वांत उंच तिरंगा अमृतसर आणि पाकिस्तानच्या लाहोर या शहरांमधूनही दृष्टीस पडणार आहे, असे बीएसएफच्या पंजाब फ्रंटियरचे महानिरीक्षक अशोक कुमार यादव यांनी सांगितल्याचे एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
३५० फूट उंचीवर हा तिरंगा फडकणार असल्याने त्या तुलनेत त्याचा आकारही तसाच असणार आणि म्हणूनच हा सर्वांत मोठा तिरंगा ठरणार आहे. रीट्रीट समारंभाच्या वेळी त्याठिकाणी देशभक्तिमय वातावरण असते आणि दोन्ही बाजूंच्या लोकांच्या भावना उफाळून आलेल्या असतात. त्या दृष्टीने हा तिरंगा दीपस्तंभासारखे काम करेल, असेही यादव यांनी सांगितले.
याठिकाणी असलेले वातावरण लक्षात घेऊन सीमेवर विशेष पद्धतीने तयार केलेल्या व्यासपीठावर तिरंग्यासाठीचा हा खांब उभारण्यात येईल, असे बीएसएफचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी व उपमहानिरीक्षक आर. एस. कटारिया यांनी सांगितले.
सध्या सर्वांत उंच तिरंगा फडकविण्याचा मान झारखंडला मिळाला आहे. याच वर्षी २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून रांची येथे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते २९३ फूट उंच आणि ९९ बाय ६६ एवढ्या मोठ्या आकाराचा तिरंगा फडकविण्यात आला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28102

Posted by on Apr 30 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (403 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२९ एप्रिल] - व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारातील कंपनीला काळ्या यादीत टाकल्याचा दावा करणारे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी ...

×