Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » वार्षिक दहा लाख उत्पन्न गटांना गॅस सब्‌सिडी नाही

वार्षिक दहा लाख उत्पन्न गटांना गॅस सब्‌सिडी नाही

=व्यंकय्या नायडू यांची माहिती=
Venkaiah-Naidu_3हैदराबाद, [१५ नोव्हेंबर] – ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयांच्या घरात आहे, त्यांना स्वयंपाकाच्या गॅसवरील सब्‌सिडी नाकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत केंद्रीय नगर विकास व संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आज रविवारी येथे दिले.
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मी अलीकडेच भेट घेतली. त्यांनी मला सांगितले की, सरकारला असंख्य बेकायदेशीर गॅस कनेक्शनची माहिती मिळाली आहे. अशा बेकायदेशीर एलपीजी ग्राहकांना सब्‌सिडीच्या दरात होणारा सिलेंडरचा पुरवठा थांबवून हजारो कोटी रुपये वाचविण्याची योजना सरकारने तयार केली आहे. सोबतच, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयांच्या घरात आहे, अशा कुटुंबांना एलपीजीवर मिळणारे अनुदान बंद करण्याच्या योजनेवरही सरकार विचार करीत आहे. त्याचप्रमाणे मंत्र्यांना देखील गॅस सब्‌सिडीची गरज नसल्याने त्यांनाही सब्‌सिडी नाकारण्यात येणार आहे, असे सांगताना नायडू म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत सुमारे ३० लाख लोकांनी सब्‌सिडी नाकारली आहे. त्याचा फायदा गरजू आणि गरिबांना देण्यात येणार आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा चेम्बर्स ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित एका समारंभात ते बोलत होते.
ते म्हणाले की, सरकारने आतापर्यंत १५ महत्त्वाच्या क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक धोरणात ३५ वेळा बदल केले आहेत. देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) यासह अन्य विधेयकांना संसदेत पारित करण्यासाठी विरोधी पक्षांच्या सहकार्याची अपेक्षाही यावेळी नायडू यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील रालोआ सरकारला बदनाम करणार्‍या विरोधकांवरही त्यांनी यावेळी टीकेची झोड उठविली. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेला ऐतिहासिक जनाधार विरोधकांना पचविणे शक्य झाले नाही. त्यांनी या जनाधाराचा सहिष्णुतेचे दर्शन घडवून सन्मान करायला हवा. देशाच्या काही भागात घडलेल्या घटनांचे राजकीय भांडवल करून जगात देशाची बदनामी करण्याची मोहीम विरोधकांनी थांबवायला हवी, असा सल्लाही नायडू यांनी दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25469

Posted by on Nov 16 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1237 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१५ नोव्हेंबर] - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याने भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज ...

×