Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » वास्को द गामाच्या बुडालेल्या जहाजाचा लागला शोध

वास्को द गामाच्या बुडालेल्या जहाजाचा लागला शोध

vasco da gama shipदुबई, [१६ मार्च] – युरोपातून भारतात समुद्र मार्गाने प्रवास करणारा पहिला युरोपियन वास्को द गामाचं समुद्रात बुडालेलं जहाज अखेर सापडलं आहे. ५०० वर्षांपूर्वी या बुडालेल्या जहाजाचे अवशेष ओमानजवळ समुद्रात सापडले आहेत.
१६ शतकात बुडालेल्या जहाजाचे २०१३ मध्ये ब्ल्यू वॉटर रिकव्हरीज आणि ओमान मिनिस्ट्री ऑफ हेरिटेज अँड कल्चरने शोधमोहिम सुरू केली. इंडियो नावाची दुर्मिळ चांदीची नाणी, सिरॅमिक्स, एक घंटा अशा वस्तू सापडल्या आहेत. तसेच जहाजाचे काही अवशेषही सापडले आहेत. विशेष म्हणजे जहाजाच्या अवशेषांसोबतच चांदीची काही दुर्मीळ नाणीही पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांना सापडली आहेत. १४९९ मध्ये वास्कोच्या पहिल्या भारतभेटीनंतर ही नाणी बनवल्याची माहिती आहे.
वास्को द गामाच्या काकांनी हे पोर्तुगीज जहाज समुद्रात नेलं होतं. मात्र हिंदी महासागरात अल – हलानियाह बेटाजवळ जोरदार वादळामुळे जहाज बुडालं होतं. या दुर्घटनेत जहाजाचे कमांडर विसेन्ट सॉडरसह सर्वांना जलसमाधी मिळाली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27362

Posted by on Mar 17 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (647 of 2458 articles)


=तपासात सहकार्य करीत नसल्याचा ईडीचा आरोप= मुंबई, [१५ मार्च] - राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणात तसेच अन्य ११ प्रकल्पांमध्ये घोटाळे ...

×