Home » ठळक बातम्या, मराठवाडा » विकासाच्या राजकारणाला साथ द्या : गडकरी

विकासाच्या राजकारणाला साथ द्या : गडकरी

Nitin-Gadkari1लातूर, उदगीर, [१२ ऑक्टोबर] – नरेंद्र मोदी यांनी क्षुद्र राजकारणाला मूठमाती देऊन विकासाच्या राजकारणाची देशात सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील जातीपातीचे राजकारण संपवून विकासाचे राजकारण सुरू करण्यासाठी भाजपाला साथ द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.लातूर येथे भाजपा उमेदवार शैलेश लाहोटी व उदगीर येथे भाजपा उमेदवार सुधाकर भालेराव यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर उमेदवार आ. सुधाकर भालेराव, जिल्हाध्यक्ष प्रा. नागनाथ निडवदे, खा. सुनील गायकवाड, रूपाताई पाटील निलंगेकर, नामदेव आपटे, उत्तरा कलबुर्गे, माजी आ. टी. पी. कांबळे, रामचंद्र तिरुके, प्रभाकर काळे, चंद्रकांत कोठारे, गोविंद केंद्रे, मनोहर भंडे, विवेक देशपांडे, भगवान पाटील तळेगावकर, आ. प्रभू चव्हाण, राम गुंडीले, विनायक बेंबडे यांची उपस्थिती होती.लातूर येथील टाऊन हॉलच्या सभेत व्यासपीठावर ऍड. बळवंत जाधव, गुरुनाथ मगे, खा. सुनील गायकवाड, डॉ. गोपाळराव पाटींल, मोहन माने, शैलेश गोजमगुंडे, गुरुनाथ मगे, चंदकांत चिकटे यांची उप्स्थिती होती.गडकरी म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या हाती सत्ता आल्यानंतर देशाची विकासाची दिशा बदलली आहे. सामान्य माणसाच्या विकासाला प्राधान्य दिले जात आहे. ४० हजार कोटी रुपयांच्या रस्त्याची कामे सुरू झाली आहेत.
केंद्र सरकारच्या निधीमधून महाराष्ट्रातील रस्ते पुढचे ५० वर्षे टिकतील या पध्दतीने दर्जेदार केले जाणार आहेत. आरटीओ खात्यात असलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा विकसित केली जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा विकास केला जाईल. लाखो तरुणांना रोजगार मिळेल. देशातील लाखो तरुणांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम दिले जाईल. भारत हे जगातील शक्तिशाली, सामर्थ्यवान राष्ट्र बनेल. शेजारी राष्ट्राची वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही या पध्दतीने आपली शक्ती वाढेल. याच पध्दतीने महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी भाजपाला सत्ता द्या. गेल्या पंधरा वर्षात आघाडी सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. रस्ते, सिंचन, जिथे मिळेल तिथे खाणे एवढे एकच काम झाले आहे. शेतीच्या क्षेत्रात मध्यप्रदेशचा विकासदर २४ टक्के तर ज्या राज्याचे केंद्रीय कृषीमंत्री होते त्याचा राज्याचा विकासदर केवळ ३ टक्के. शेतकर्‍यांच्या हिताचा आजवर कोणी विचारच केला नाही. केवळ तोंडात शेतकरी व सामान्य माणसाच्या हिताची भाषा मात्र कृती नेमकी उलट झाली. आतापर्यंत केलेल्या चुका विसरून जा. लोकसभेला जसा योग्य निर्णय घेतला तसाच निर्णय विधानसभा निवडणुकीत घेऊन आपले व आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य घडवा, असे आवाहन त्यांनी केले.
कॉंग्रेस पदाधिकारीभाजपात दाखल
लातूर जिल्हा कॉंगे्रसचे माजी सरचिटणीस व राज्य वखार महामंडळाचे माजी संचालक ऍड. भारत साबदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर तांदळे व लातूर महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य रविंद्र पाठक यांनी गडकरी यांच्या टाऊन हॉलच्या सभेत भाजपात प्रवेश घेतला.
मान्यवरांनी केला भाजपात प्रवेश
उदगीर येथे झालेल्या सभेत माजी आ. राम गुंडीले, विनायक बेंबडे, भगवानराव पाटील तळेगावकर, कॉंग्रेसचे रविकांत अंबेसंगे, ऍड. प्रभाकर काळे, आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=17333

Posted by on Oct 13 2014. Filed under ठळक बातम्या, मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मराठवाडा (2363 of 2454 articles)


मुंबई, [११ ऑक्टोबर] - अमिताभ बच्चन यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. जगभरातील चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहे. या ...

×