Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘विक्स ऍक्शन ५०० एक्स्ट्रा’ची विक्री बंद

‘विक्स ऍक्शन ५०० एक्स्ट्रा’ची विक्री बंद

Vicks_Action_500नवी दिल्ली, [१५ मार्च] – सर्दी आणि डोकेदुखी सारख्या आजारावर लवकर बरे वाटावे म्हणून नेहमी घेण्यात येणारे औषध ‘विक्स ऍक्शन ५०० एक्स्ट्रा’ या औषधाचे उत्पादन आणि विक्री अमेरिकन ग्राहक आरोग्य कंपनी ‘प्रॉक्टर अँड गॅम्बल’ अर्थात ‘पी अँड जी’ ने तातडीने थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न आणि औषध नियामक मंडळांनी या गोळीवर बंदी घातली आहे.
पॅरासिटामॉल, फेनिलफ्राईन व कॅफिन औषधांच्या एकत्रीकरणातून विक्स ऍक्शन ५०० एक्स्ट्रा तयार केली जाते. सरकारने एकाच औषधात दोन ड्रग्ज असणार्‍या औषधांवर बंदी घातली आहे. प्रतिजैविक आणि वेदनाशामक औषधांसह एकूण ३४४ औषधांवर सरकारने नुकतीच बंदी घातली होती. प्रॉक्टर अँड गॅम्बल ही कंपनी पॅरासिटेमॉल, फेलनेफ्रिन, कॅफीनसारखी औषध बनवते. त्यामुळे सरकारने दिलेल्या आदेशानंतर या औषधाचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
विक्स ऍक्शन ५०० एक्स्ट्रा वगळता विक्सच्या इतर उत्पादनांवर बंदी घातलेली नाही. तसेच विक्सची उत्पादनं सुरक्षित आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27334

Posted by on Mar 16 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (654 of 2453 articles)


मुंबई, [१५ मार्च] - दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भक्कम पुरावे सादर केले असल्यानं छगन भुजबळ यांना अटक झाली असून ...

×