Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » विजय मल्ल्यांची १४११ कोटींची संपत्ती जप्त

विजय मल्ल्यांची १४११ कोटींची संपत्ती जप्त

=ईडीची धडक कारवाई=
Vijay Mallyaमुंबई, [११ जून] – आयडीबीआय बँकेचे सुमारे ९०० कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्याच्या दिशेने धडक कारवाई करताना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज शनिवारी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांची सुमारे १४११ कोटी रुपये किमतीची संपत्ती जप्त केली.
विजय मल्ल्या आणि त्यांच्या मालकीच्या यु. बी. लिमिटेड कंपनीच्या मालकीची ही संपत्ती असून, आजच्या बाजारभावानुसार तिची किंमत १४११ कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती ईडीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
यात बँकेत जमा असलेले ३४ कोटी रुपये, बंगळुरू आणि मुंबईतील फ्लॅट, चेन्नईतील साडे चार एकरचा औद्योगिक भूखंड, कूर्ग येथील २८.७५ एकरचा कॉफी प्रकल्प भूखंड, तसेच युबी शहर आणि बंगळुरू येथील निवासी व व्यावसायिक बांधकाम असलेली इमारत आणि किंगफिशर टॉवरचा समावेश आहे.
आयडीबीआयच्या ९०० कोटी रुपयांच्या कर्जासह विविध बँकांचे सुमारे ९४०० कोटी रुपयांचे कर्ज थकवून मल्ल्या यांनी लंडनमध्ये पळ काढला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28549

Posted by on Jun 12 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (251 of 2453 articles)


शेगाव, [११ जून] - टाळ मृदुंगाचा मेळा साधुनिया | पावलांचा त्याला ठेका मिळोनिया | विसरले जगा सारे नर नारी | ...

×