Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » विजय मल्ल्यां देशातून पळाले!

विजय मल्ल्यां देशातून पळाले!

Vijay Mallyaमुंबई, [९ मार्च] – एकूण १७ बँकांकडून तब्ब्ल ९ हजार कोटींहून अधिक कर्ज घेतलेले किंगफिशरचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती विजय मल्ल्यांनी देश सोडला असल्याची माहिती आज बुधवारी सरकारने कोर्टात दिली आहे. अटॉर्नी जनरल मुकुल रहोतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे.
वेगवेगळ्या बँकांकडून एकूण ९ हजार कोटींहून अधिक कर्ज घेतलेल्या विजय मल्ल्यां यांनी कर्जाची परतफेड न केल्याने बँकांनी एकत्रितपणे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बँकांकडून २ मार्च रोजी विजय मल्ल्या यांचे पासपोर्ट जप्त करण्याची मागणी करण्यात आली होती. तेव्हाच मल्ल्या यांना पुढील परिस्थितीचा अंदाज आला आणि तातडीने २ मार्चलाच देश सोडल्याची माहिती ऍटर्नी यांनी आज न्यायालयात दिली. इंग्लंडमध्ये त्यांची प्रचंड संपत्ती आहे. जितके कर्ज त्यांनी बँकांकडून घेतले आहे, त्याच्या दुप्पट संपत्ती मल्ल्यां यांची लंडनमध्ये आहे. त्यामुळे ते तिथेच असण्याची शक्यता वर्तविली जात आहे, असे ऍटर्नी जनरल मुकुल रहोतगी यांनी सांगितले. दरम्यान, लंडनमधील भारतीय दूतावासतर्फे विजय मल्ल्यांना नोटीस पाठविण्यात येणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27168

Posted by on Mar 10 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (717 of 2453 articles)


नवी दिल्ली, [९ मार्च] - दर शुक्रवारी प्रत्येक सरकारी कर्मचारी आता खादी कपड्यांमध्ये दिसण्याची शक्यता वर्तविली आहे. देशातील खादी उद्योगाला ...

×