Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » विजय मल्ल्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट

विजय मल्ल्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट

Vijay Mallyaमुंबई, [१८ एप्रिल] – किंगफिशर सर्वेसर्वा विजय मल्ल्यांविरोधात ९०० कोटींच्या मनी लॉंडरिंग प्रकरणात विशेष न्यायालयाने आज सोमवारी अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. विशेष न्यायाधीश पी. आर. भावके यांनी ईडीच्या याचिकेवर हा आदेश दिला. या आदेशामुळे मल्ल्या यांच्या विरोधात इंटरपोलचा रेड कॉर्नर अलर्ट जारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्याचबरोबर परदेशात संपत्ती खरेदीसाठी विजय मल्ल्या यांनी आयडीबीआयकडून घेतलेल्या ४३० कोटींच्या कर्जाचा वापर केल्याच्या अंमलबजावणी संचलनालयाच्या दाव्याविरोधात किंगफिशरकडून दाखल करण्यात आलेली याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावली.
दरम्यान, ईडीने मल्ल्यांविरोधात केलेले दावे खोटे आणि चूकीचे असल्याचे सांगत किंगफिशर एअरलाईन्स कंपनीने मुंबई सेशन्स कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने विजय मल्ल्या यांच्याविरोधात अजामीनपत्र अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27862

Posted by on Apr 18 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (478 of 2453 articles)


कोलकाता, [१७ एप्रिल] - हिंसाचार, मतदान केंद्र बळकावणे आणि राजकीय संघर्ष अशा घटना घडत असतानाही पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या ...

×