Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » विजय माल्यांना विदेशात जाण्यापासून रोखा

विजय माल्यांना विदेशात जाण्यापासून रोखा

=१७ बँकांची सुप्रीम कोर्टात याचिका, आज सुनावणी=
Vijay Mallyaनवी दिल्ली, [८ मार्च] – अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी आणि सीबीआयच्या कचाट्यात सापडलेले मद्यसम्राट विजय माल्या यांच्या अडचणीत आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. विजय माल्यांना विदेशात जाण्यापासून रोखण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सार्वजनिक क्षेत्रातील १७ बँकांच्या महासंघाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून, त्यावर उद्या बुधवारीच सुनावणी होणार आहे.
भारतीय स्टेट बँकेने यापूर्वीच माल्यांना भारत सोडण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. या याचिकेवरही उद्याच सुनावणी करण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि न्या. उदय ललित यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने स्पष्ट केले.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज विजय माल्यांनी थकविले असून, ते आता देशाबाहेर जाण्याच्या तयारीत असल्याने, याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची गरज बँकांच्या वतीने युक्तिवाद करताना ऍटर्नी जनरल मुकुल रोहतागी यांनी नमूद केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27126

Posted by on Mar 9 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (731 of 2453 articles)


=उद्या अंतराळात झेपावणार= चेन्नई, [८ मार्च] - भारताचा सहावा नेव्हीगेशनल उपग्रह ‘आयआरएनएसएस-१एफ’ च्या प्रक्षेपणासाठी आज मंगळवारी आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ ...

×