Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » विजय माल्यांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

विजय माल्यांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

Vijay Mallyaहैदराबाद, [१३ मार्च] – सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळ काढणारे मद्यसम्राट विजय माल्या यांच्याविरोधात हैदराबाद येथील न्यायालयाने गैरजमानती अटक वॉरंट जारी केला आहे. यामुळे माल्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने विजय माल्यांसोबतच सध्या जमिनीवर असलेल्या त्यांच्या किंगफिशर एअरलाईन्सचे मुख्य आर्थिक अधिकारी ए. रघुनाथ यांच्याविरोधातही अटक वॉरंट जारी केला आहे. पोलिसांनी या दोघांनाही अटक करून १३ एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर करावे, असा आदेश न्या. जी. एस. रमेश कुमार यांनी दिला आहे.
जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट या कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने उपरोक्त आदेश जारी केला. विमानतळाचे भाडे देण्यास माल्या असमर्थ ठरले असून, त्यांनी दिलेले धनादेशही वटले नसल्याने माल्यांविरोधात फौजदारी खटला भरण्यात यावा, अशी विनंती कंपनीने याचिकेत केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27281

Posted by on Mar 14 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (673 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१३ मार्च] - बुलेटप्रुफ जॅकेटच्या टंचाईमुळे जवळपास दोन लाख भारतीत जवान जॅकेटविनाच आपले कर्तव्य बजावित आहेत. यामुळे त्यांच्या ...

×