Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » विज्ञान, गणितात पूर्वजांचे योगदान मोलाचे

विज्ञान, गणितात पूर्वजांचे योगदान मोलाचे

=राजनाथसिंह यांचे प्रतिपादन=
rajnathsingh2लखनौ, [१९ जानेवारी] – भविष्यशास्त्र, विज्ञान आणि गणितात आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान अभूतपूर्व आणि अत्यंत मौल्यवान आहे. त्यांच्या या योगदानामुळेच आपल्याला चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणावर माहिती प्राप्त करण्यासाठी अमेरिका किंवा अन्य देशांच्या मदतीची आवश्यकता भासत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सोमवारी येथे केले.
‘‘आपली प्रसारमाध्यमे अनेकवेळा संभ्रमात सापडतात. ते म्हणतात की, एका विशिष्ट तारखेला चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होणार असल्याची माहिती अमेरिकन वेधशाळेकडून मिळाली. यासाठी तुम्हाला कोणत्याही देशाच्या वेधशाळेकडे जाण्याची गरजच नाही. आपल्या प्रत्येकाच्या जवळ एक पंडित अर्थात ज्योतिषाचार्य असतो. त्याला विचारा… ते पंचांग उघडतील आणि शंभर वर्षांपूर्वी कोणकोणत्या तारखांना चंद्रग्रहण व सूर्यग्रहण होते, तसेच आगामी १०० वर्षात कोणकोणत्या तारखांना ते लागणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला देतील,’’ असे राजनाथसिंह यांनी लखनौ विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित करताना सांगितले.
आपल्या संतांनी सांगितलेच आहे की, पृथ्वीचे अस्तित्व १.९६ अब्ज वर्षांपूर्वीचे आहे. विज्ञानाने ही सत्यता सुरुवातीच्या काळात स्वीकारली नव्हती. पण, नंतर विज्ञानाचाही यावर विश्‍वास बसला. पाश्‍चिमात्य वैज्ञानिक आपल्याला जे सांगतात, तेच आपल्या वृत्तवाहिन्या व अन्य प्रसारमाध्यमे सांगतात, असे राजनाथसिंह म्हणाले.
ज्योतिष, विज्ञान आणि गणितात भारताकडे जे ज्ञान आहे, ते जगातील अन्य कोणत्याही देशाकडे नाही. भूमिती असो वा गणित किंवा अन्य कोणताही विषय असो, भारताकडे असलेल्या ज्ञानाची बरोबरी कुणीच करू शकत नाही. ब्रह्मांडाविषयीचा अभ्यास करण्याची भारताची जी प्राचिन पद्धत आहे, ती आजच्या आधुनिक पद्धतीपेक्षाही सरस आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19810

Posted by on Jan 20 2015. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (2211 of 2452 articles)


=संरक्षण मंत्र्यांनी दिली गोड भेट, भारताच्या युद्ध सामर्थ्यात वाढ= बंगळुरू, [१७ जानेवारी] - स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित करण्यात ...

×