Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » विज्ञान, तंत्रज्ञानाचा फायदा उपेक्षितांपर्यंत पोचवा

विज्ञान, तंत्रज्ञानाचा फायदा उपेक्षितांपर्यंत पोचवा

  • पंतप्रधान मोदींचे वैज्ञानिक, संशोधकांना आवाहन
  • १०२ व्या भारतीय विज्ञान परिषदेचे थाटात उद्‌घाटन

MODI, FADANVIS AT MUMBAI UNIVERCITYमुंबई, [३ जानेवारी] – मानवी जीवनाचा स्तर उंचावण्याची क्षमता केवळ विज्ञानात आहे. यामुळे देशातील वैज्ञानिक, संशोधकांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवीन शोधांचा फायदा गरीब आणि अतिदुर्गम भागातील सर्वात उपेक्षित लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात शनिवारी १०२ व्या भारतीय विज्ञान परिषदेचे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंतप्रधानांनी हे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय तंत्रज्ञान व भूविज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय तंत्रज्ञान व भूविज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी, परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस.बी. निमसे, कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर आदी उपस्थित होते. मोदी यांच्या हस्ते नोबेल पुरस्कार विजेते व संशोधक सुभाष खोत, मंजूल भार्गव, एसआरएस वर्धन आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
नामवंत शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांना श्रद्धांजली अर्पण करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. भारतीय शास्त्रज्ञांमध्ये जग बदलण्याची भरपूर क्षमता असल्याचे मंगळ मोहीम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करून आपण सिद्ध केले आहे. हुदहुद या चक्रीवादळाची अचूक माहिती देऊन देशातील वैज्ञानिकांनी हजारो नागरिकांचे जीव वाचविले. भारतीय वैज्ञानिकांच्या या कामगिरीचा मला प्रचंड अभिमान असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. भारताच्या उज्ज्वल व समृद्ध भविष्यासाठी आपल्याला विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती यांना देशाच्या सर्वाधिक प्राधान्यक्रमाच्या बाबींमध्ये समाविष्ट केले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. आजच्या घडीला देशात भुकेचा प्रश्‍न, अंधश्रद्धा, पर्यावरण आणि स्वच्छता असे अनेक महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. शेतीमधील जोखीम कमी करून ती विज्ञानाच्या आधारे फायदेशीर कशी बनविता येईल, ग्रामीण भागात सुयोग्य आणि किफायतशीर तंत्रज्ञानाचा विकास करून आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, प्रदूषण विरहीत तंत्रज्ञान किफायतशीर करणे, भारताला एक आघाडीचे उत्पादनक्षम राष्ट्र बनवणे आणि ज्ञान व तंत्रज्ञानाने युक्त उद्योगांचे केंद्र बनविणे ही भारतीय शास्त्रज्ञांसमोरील काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
शैक्षणिक स्वातंत्र्यावर भर
देशातील संशोधन आणि विकासात्मक घडामोंडीसाठी आपण विद्यापीठ प्रणाली निर्माण केली पाहिजे. खूपच जास्त नियंत्रण आणि किचकट प्रक्रियेच्या पाशातून विद्यापीठांना मुक्त केले पाहिजे. देशाच्या विकासाठी भारतीय उद्योगांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील गुंतवणूक स्वत:च्या हितासाठी वाढवावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. भारतीय औषधनिर्मिती उद्योगाने जगामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचे कारण या क्षेत्रामध्ये संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे, याकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले.
निधीचे प्रस्ताव रखडणार नाही
वैज्ञानिक प्रकल्पांना निधी देण्याचे प्रस्ताव फार काळ प्रलंबित राहता कामा नये आणि या प्रकल्पांना निधी देण्यासाठी वैज्ञानिक विभागांना योग्य अधिकार असले पाहिजेत. जैवतंत्रज्ञान, लघु-विज्ञान, कृषी आणि वैद्यकीय संशोधन या क्षेत्रातील संशोधन आणि विकासासंदर्भात नियामक धोरणे स्पष्ट असावीत. मात्र, कोणताही शोध करताना सरकारवरच अवलंबून राहाण्याची गरज नसल्याचे मतही मोदी यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19444

Posted by on Jan 4 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (2288 of 2452 articles)


=केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री नजमा हेपतुल्लांचा सवाल= मुंबई, [३ जानेवारी] - मुस्लिमांना आरक्षण दिल्याने त्यांच्या विकासाचा प्रश्‍न सुटणार नाही, असे स्पष्ट ...

×