Home » ठळक बातम्या, विदर्भ » विदर्भातील जलाशये तुडुंब भरली

विदर्भातील जलाशये तुडुंब भरली

  • यवतमाळमधील धरणांत ९६ टक्के जलसाठा
  • विदर्भातील धरणांत ७५ टक्के जलसंचय

Gosikhurd dam Vidarbhaअमरावती/नागपूर, [१९ सप्टेंबर] – विदर्भातील धरणांमध्ये भरपूर पाणी साठले असून अमरावती विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये १९ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत एकूण संचय पातळीच्या तुलनेत ७८.१५ टक्के पाण्याचा संचय झाला आहे. तर नागपूर विभागातही सर्व धरणे मिळून सुमारे ७५ टक्के जलसंचय झाल्यामुळे दुष्काळाची दाहकता आता बर्‍याच अंशी कमी झाली आहे. रब्बी पिकांसाठी हा पाऊस एकप्रकारे वरदानच ठरला आहे.
अमरावती विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे, सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा ९५.८७ आणि पूस प्रकल्प ६०.४६ टक्के भरला आहे. अरुणावतीमध्येही ४० टक्के जलसंचय झाला आहे. हे तिन्ही मोठे प्रकल्प आहेत. याच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प सायखेडा, बोरगाव, वाघाडी, गोकी हे १०० टक्के भरले असून अधरपूस ९७.१३ आणि नवरगाव ८९.१२ टक्के भरले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हे मोठे धरण १०० टक्के भरले आहे. तर पलढग धरण ९५ टक्के भरले आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा धरण ९८.३७ टक्के भरले आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग अजूनही सुरूच आहे.
अमरावती विभागात मोठे ९, मध्यम २३ आणि लघु पाटबंधारे प्रकल्प ४२८ आहेत. २३ मध्यम प्रकल्पांमध्ये ७२.४६ टक्के पाणीसाठी झालेला आहे. हे तिन्ही प्रकल्प मिळून पाण्याचा एकूण साठा सुमारे ७० टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे अमरावती विभागातील शेतकरी खूपच सुखावला आहे. १७ आणि १८ तारखेला आलेल्या पावसामुळे खडकपूर्णा धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे १९ दरवाजे उघडावे लागले होते. तर उर्ध्व वर्धाचे तीन दरवाजे उघडावे लागले होते. तर मध्यम प्रकल्पांमध्ये अमरावती जिल्ह्यातील पूर्णा, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव या मध्यम प्रकल्पांच्या दरवाजांमधून विसर्ग करावा लागला होता.
मोठ्या धरणात ७५, तर मध्यम प्रकल्पात ८४ टक्के पाणीसाठा
नागपूर विभागातही सतत दोन दिवस संततधार बरसल्याने पूर्व विदर्भातील प्रकल्प चांगलेच भरले आहेत. मोठ्या धरणांत ७५, तर मध्यम प्रकल्पात ८४ टक्के पाणीसाठा झाला आहे.
नागपूर विभागातील पेरणी आणि रोवणीची कामे आटोपली आहेत. शिवाय धरणांमध्येही बर्‍यापैकी पाणीसाठा झाला आहे़ १८ सप्टेंबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार नागपूर विभागातील १७ मोठ्या प्रकल्पांमध्ये ७५ टक्के पाणीसाठा असून ४० मध्यम प्रकल्पांमध्ये ८४ टक्के पाणीसाठा झाला आहे़
तसेच लघु प्रकल्पांमध्ये देखील ८० ते ९० टक्के इतका जलसंचय झाला आहे़ विभागातील मोठ्या प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता ३२५६. ७ दलघमी इतकी आहे़ तर ४० मध्यम प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ५५१. ४५ दलघमी इतकी आहे़ गतवर्षी याच कालावधीत नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ८३ टक्के, तर मध्यम प्रकल्पांमध्ये ८४ टक्के पाणीसाठा होता़
नागपूर विभागातील मोठे प्रकल्प तोतलाडोह पोथरा ९९ टक्के, तोतलाडोह ९४ टक्के, लोअर नांद व वडगाव ९७ टक्के, पुजारी टोला ९३, कालीसरार ९१, दिना ८७, धाम ९४ व गोसीखुर्द टप्पा-२ हा प्रकल्प ८१ टक्के भरला आहे.
विभागातील जिल्हानिहाय जलसंचय याप्रमाणे : नागपूर ८६ टक्के, भंडारा : ७०, गोंदिया ७०, वर्धा ९४, चंद्रपूर ५३ व गडचिरोली ७३ टक्के.
पिण्यासाठी पाणी आरक्षित
यापूर्वी जलाशयांमधील पाणी केवळ पिण्यासाठीच वापरावे, अशा सक्त सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्या होत्या. आता काही भागात भरपूर पाऊस झाला असला तरी अनेक भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्या भागात पाणी पिण्यासाठीच राखीव राहणार आहे. अन्य भागांमध्ये नियोजन जिल्हाधिकार्‍यांच्या पातळीवर होईल़

Short URL: https://vrittabharati.in/?p=23908

Posted by on Sep 20 2015. Filed under ठळक बातम्या, विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विदर्भ (1442 of 2455 articles)


=केजरीवालांना आणखी एक धक्का= नवी दिल्ली, [१९ सप्टेबर] - गंभीर गुन्ह्यांत आमदारांचे सुरू असलेले अटकसत्र, लोकप्रियतेत सातत्याने होत असलेली घट ...

×