Home » ठळक बातम्या, विदर्भ » विदर्भातील १२ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर

विदर्भातील १२ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर

=अमरावती विभागातील ५,९०० गावांचा समावेश=
dushkalमुंबई, [२५ मार्च] – राज्य शासनाने शुक्रवारी एक मोठा निर्णय घेताना विदर्भातील १२ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, यामुळे राष्ट्रीय आपत्ती मदत निधीच्या (एनडीआरएफ) मदतीपासून वंचित राहिलेल्या कापूस, धान आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विदर्भात दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या १२ हजारपैकी ५,९०० गावे अमरावती विभागातील असून, उर्वरित गावे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातील आहेत.
एनडीआरएफ योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ही गावे बसत नाहीत, असा अहवाल या जिल्ह्यातील अधिकार्‍यांनी दिला होता. परंतु, कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज म्हणून ही मार्गदर्शक तत्त्वे बाजूला सारून निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सांगितले होते.
या योजनेच्या निकषांनुसार पिकांच्या नुकसानासोबतच पडलेल्या पावसाची टक्केवारी विचारात घेऊन दुष्काळ जाहीर केला जातो. कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असूनही एनडीआरएफच्या निकषांनुसार या गावांना दुष्काळग्रस्त घोषित करता आले नव्हते, असे मुुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या पार्श्‍वभूमीवर महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्याचा औपचारिक निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्यावर केंद्र सरकारशीदेखील चर्चा केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27565

Posted by on Mar 26 2016. Filed under ठळक बातम्या, विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विदर्भ (575 of 2455 articles)


मुंबई, [२३ मार्च] - दादरमधील इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला बाबासाहेबांच्या जन्मदिनानंतर म्हणजे १४ एप्रिलनंतर ...

×