Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » विदेशात भारतीयांचे १२.५ लाख कोटी

विदेशात भारतीयांचे १२.५ लाख कोटी

=काळ्या पैशावर इटलीतील तज्ज्ञांची माहिती=
black_moneyनवी दिल्ली, [२१ मार्च] – विदेशी बँकांमध्ये लपवून ठेवण्यात आलेला भारतीयांचा काळा पैसा देशात परत आणण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने व्यापक अभियान राबविले असतानाच, विदेशी बँकांमध्ये भारतीयांचा सुमारे १२.५ लाख कोटी अघोषित काळा पैसा असल्याची धक्कादायक माहिती बँक ऑफ इटलीच्या वरिष्ठ तज्ज्ञांनी दिली.
वॅलेरिया पेलेग्रिनी, ऍलेसँड्रा सेनेली आणि एनरिको तोस्ती या तीन तज्ज्ञांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट (बीआयएस)कडून दोन वर्षांपूर्वी प्राप्त केलेल्या माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार केला आहे.
विदेशातील बँकांमध्ये जगाच्या पाठीवरील विविध देशांच्या नागरिकांनी जितका काळा पैसा लपविला आहे, त्यात भारतीयांचा वाटा १२.५ लाख कोटी इतका आहे. भारतीयांचा विदेशात नेमका किती काळा पैसा आहे, याचे विश्‍लेषण करण्यासाठी या तज्ज्ञांनी दोन पद्धतींचा अवलंब केला. यातील एका पद्धत अशी की, २०१३ मध्ये भारताचा एकूण जागतिक उत्पन्नात २.५ टक्के इतका वाटा होता. ही एकूण रक्कम १८१ अब्ज डॉलर्स इतकी आहे. हा वाटा विचारात घेऊनच या तज्ज्ञांनी भारतीयांच्या विदेशातील काळ्या पैसाची आकडेवारी काढली. दुसर्‍या पद्धतीनुसार भारताने जितकी संपत्ती जाहीर केली आहे, कदाचित तितकीच संपत्ती भारतीयांनी काळा पैसा म्हणून विदेशात जमा केली असावी, असा अंदाज त्यांनी बांधला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27500

Posted by on Mar 22 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (602 of 2458 articles)


थिरुवनंतपुरम्, [२१ मार्च] - नव्यानेच उदयाला आलेल्या भारत धर्म जन सेना (बीडीजेएस) आणि भाजपा यांच्या युतीत झालेल्या समझोत्यानुसार येत्या विधानसभा ...

×