Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » विदेशींना भारतात गर्भ भाड्याने घेता येणार नाही

विदेशींना भारतात गर्भ भाड्याने घेता येणार नाही

=सरोगसीवर केंद्राची सुप्रीम कोर्टात भूमिका=
SupremeCourtनवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] – कोणत्याही विदेशी दाम्पत्याला सरोगसी प्रक्रियेच्या माध्यमातून अपत्य प्राप्त करण्यसाठी भारतीय महिलांचा गर्भ भाड्याने घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात विशद केली.
सरोगसी सेवा ही केवळ भारतीय दाम्पत्यांकरताच आहे. विदेशातील दाम्पत्यांना या सेवेचा लाभ घेता येणार नाही, असे केंद्राने न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात स्पष्ट केले.
सरोगसी सेवेला व्यावसायिक रूप देण्यास सरकारने विरोध केला. सोबतच, विदेशी दाम्पत्यांना सरोगसी सेवेचा लाभ देण्यासाठी विदेशातून मानवी भृण आयात करण्यावरही बंदी घालण्यात आली असल्याचे सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.
तत्पूर्वी, भारतातील सरोगसी सेवेच्या माध्यमातून विदेशी दाम्पत्यांनाही अपत्य प्राप्त करता यावे, यासाठी, विदेशातून मानवी भृण आयात करण्यावर बंदी घालणारा २०१३ चा अध्यादेश मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, काही कारणांमुळे नंतर तो बारगळला होता.
दरम्यान, केंद्राची भूमिका न्यायालयात सादर होण्यापूर्वीच त्यातील मजकूर वृत्तवाहिन्यांपर्यंत पोचल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. विदेशी दाम्पत्यांना भारतात सरोगसीच्या माध्यमातून अपत्य प्राप्त करण्यास केंद्र सरकार परवानगी देणार नाही, असे वृत्त आज बुधवारी सकाळपासूनच काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25378

Posted by on Oct 29 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1264 of 2453 articles)


सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश नवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] - देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमधून सर्वच प्रकारचे आरक्षण कायमचे हद्दपार करण्याची ...

×