Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » विदेशी गंगाजळीत विक्रमी वाढ

विदेशी गंगाजळीत विक्रमी वाढ

RBI-BULDINGनवी दिल्ली, [२५ जून] – ब्रिटनने युरोपियन समूहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण जगात अर्थकंप झाला. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा फार परिणाम झाला नाही. १७ जून रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या विदेशी गंगाजळीत (विदेशी विनिमय साठा) ५९.२१ कोटी डॉलर्सने वाढ होऊन ती आता ३६३.८३ अब्ज डॉलर्सच्या घरात गेली आहे.
यापूर्वी १० जून रोजी संपलेल्या आठवड्यात गंगाजळीत २३.१० कोटी डॉलर्सची घट झाली होती. त्यानंतर ब्रिटनमध्ये सार्वमताचे वारे वाहू लागले आणि त्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर दिसून आला होता. पण, याच कालावधीत भारताच्या गंगाजळीत वाढ होऊन ती आजवरच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचली होती.
भारतीय रिझर्व्ह बँकेने आज शनिवारी याबाबतची आकडेवारी जाहीर केली. विदेशी विनिमय ५९.४३ अब्ज डॉलर्सने वाढले, तर सुवर्ण कोष २०.३३ अब्ज डॉलर्सवर स्थिर राहिला, असे यात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28801

Posted by on Jun 26 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (178 of 2453 articles)


=१० लाख ब्रिटनवासीयांची मागणी= लंडन, [२५ जून] - युरोपियन समूहातून बाहेर पडणार्‍या ऐतिहासिक सार्वमताचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासांतच ...

×