Home » ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक » विद्यापीठांतील राष्ट्रविरोधी कारवाया थांबवा

विद्यापीठांतील राष्ट्रविरोधी कारवाया थांबवा

=रा. स्व. संघाच्या प्रतिनिधी सभेचे आवाहन=
rss-logoनागौर, [११ मार्च] – शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेच्या तीन दिवसीय बैठकीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशविरोधी घोषणांच्या मुद्यावर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून फुटीरतावादी शक्तींनी आपल्या कारवायांसाठी विद्यापीठांनाच केंद्र बनविले असून, या कारवायांवर सरकारने आळा घालायलाच हवा, असे आवाहनही करण्यात आले.
प्रतिनिधी सभेत माल्दातील हिंसक घटनेचाही संदर्भ देण्यात आला. अशा घटना समाजात सातत्याने वाढत असून, यातून भीतीचे वातावरण पसरविले जात आहे, असे स्पष्टपणे विशद करताना, संघाने राजकीय पक्षांना तुष्टिकरणाचे धोरण थांबविण्याचे आणि अशा घटना गंभीरपणे घेण्याचे आवाहन केले.
केंद्र आणि राज्य सरकार अशा राष्ट्र आणि समाजविरोधी शक्तींना कठोरपणे हाताळतील आणि शिक्षणाचे कार्य करणार्‍या पवित्र संस्था राजकीय व विध्वंसक कारवायांचे केंद्र होणार नाही, याची काळजी घेऊन समाजात सलोख्याचे वातावरण ठेवतील, अशी अपेक्षाही या सभेत व्यक्त करण्यात आली. अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या प्रतिनिधी सभेच्या पहिल्या दिवशी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सभेच्या सुरुवातीला रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते.
काही विद्यापीठांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या देशविरोधी कारवाया देशभक्त लोकांसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरल्या आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशाचे तुकडे करण्याच्या घोषणा कशा सहन केल्या जाऊ शकतात? ज्या अफजल गुरूने संसदेवरील हल्ल्याचा कट रचला, त्याला हुतात्मा कसे संबोधले जाऊ शकते? असे प्रश्‍नही अहवालात उपस्थित करण्यात आले आहेत.
जे लोक हा प्रकार करीत आहेत, त्यांचा या देशाच्या राज्यघटनेवर, न्यायव्यवस्थेवर आणि संसदेवर विश्‍वास नाही आणि अशा फुटीरतावादी शक्तींनी आपल्या राष्ट्रविरोधी कारवायांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठांना आपले केंद्र बनविले आहे. जेव्हा अशा राष्ट्रविरोधी शक्तींना काही राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळतो, तेव्हा देशभक्त लोकांसाठी ती बाब अतिशय चिंताजनक असते, असेही यात म्हटले आहे.
हिंसाचार आणि दहशतवादी हल्ले यासारख्या घटना गंभीर चिंतेच्या ठरल्या आहेत. अतिशय किरकोळ आणि मोठ्या मुद्यांवरून लोक हातात शस्त्रास्त्र घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माल्दातील घटना याचेच द्योतक आहे. सार्वजनिक आणि खाजगी संपत्तीचे नुकसान करणे, लुटमार, विशेषतः हिंदूंच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांची जाळपोळ करणे, या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. राजकीय पक्षांनी तुष्टिकरणाचे धोरण थांबवायला हवे आणि अशा घटना गंभीरपणे घ्यायला हव्यात. समाजात कायदा व सुव्यवस्थेसोबतच शांतता प्रस्थापित होईल, यासाठी त्यांनी सहकार्य करायला हवे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27242

Posted by on Mar 12 2016. Filed under ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक (689 of 2455 articles)


=दीक्षाभूमीला दिला ‘अ’ वर्ग दर्जा= मुंबई, [११ मार्च] - नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीचा पर्यटन स्थळ म्हणून असलेला जुना ‘क’ वर्ग ...

×