विद्यार्थ्यांनो, रोजे ठेवू नका !
Sunday, June 14th, 2015=ब्रिटनच्या प्राथमिक शाळेत आदेश जारी=
लंडन, [१३ जून] – पूर्व लंडनमधील एका प्राथमिक शाळेने, आपल्याकडील मुस्लिम विद्यार्थ्यांना शाळेत असताना पवित्र रमजान महिन्याचे उपवास अर्थात ‘रोजे’ ठेवता येणार नसल्याचे पालकांना कळविले आहे. लिटन स्कूल या शाळेच्या प्रशासनाकडून याविषयी पालकांना पत्र पाठविण्यात आले आहे. या मुद्यावरून एका नव्याच वादाला तोंड फुटले आहे. लंडन शहरातील इतर शाळांचीही या निर्णयाला सहमती आहे.
शाळेने जारी केलेल्या पत्रानुसार, ‘मुस्लिम समुदायासाठी रमजान आणि रोजे या धार्मिक परंपरांचे काय महत्त्व आहे, याची शालेय प्रशासनाला पूर्ण कल्पना आहे. मात्र, तरीही विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे उपवास करण्याची परवानगी मात्र देण्यात येणार नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही इस्लामचा संदर्भ घेतला असून, त्यातील नियमांचाही अभ्यास केला आहे. लहान मुलांनी रोजे ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे धर्मात स्पष्ट करण्यात आले आहे,’ असे शाळेकडून सांगण्यात आले आहे.
इस्लामिक कायद्यानुसार, कोणती व्यक्ती किंवा बालकाच्या प्रकृतीला प्राधान्य देण्यात आले आहे. शिवाय, सज्ञान झाल्यानंतरच रोजे ठेवावे, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘महिनाभराचे उपवास ठेवताना मुले आजारी पडतात, त्यांना चक्कर येते आणि परिणामी ते अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या शालेय कामगिरीवर होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविषयी आक्षेप असणारे पालक चर्चेसाठी शाळेत येऊ शकतात,’ असेही पत्रात म्हटले आहे. पुढच्या महिन्यापासून रमझान सुरू होत आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=22864

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!