Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » विद्या भंडारी नेपाळच्या नव्या राष्ट्रपती

विद्या भंडारी नेपाळच्या नव्या राष्ट्रपती

Nepals newly elected President Vidya Devi Bhandariकाठमांडू, [२८ ऑक्टोबर] – सत्तारूढ सीपीएन-युएमएल पार्टीच्या वरिष्ठ नेत्या आणि उपाध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांची आज बुधवारी नेपाळच्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे.
या पदासाठीच्या निवडणुकीत त्यांनी नेपाळी कॉंगे्रसच्या उमेदवाराचा पराभव केला. दरम्यान, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भंडारी यांचे अभिनंदन करतानाच, त्यांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले आहे. या निवडणुकीत भंडारी यांना ३२७ आणि त्यांचे प्रतिस्पर्धी नेपाळी कॉंगे्रसचे उमेदवार कुल बहादूर गुरुंग यांना २१४ मते मिळाली. विद्या भंडारी नेपाळच्या आजवरच्या इतिहासातील दुसर्‍या आणि या देशाने नवीन राज्यघटना स्वीकारल्यानंतर पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. याशिवाय, त्या नेपाळी सशस्त्र दलांच्या सरसेनापतीही ठरल्या आहेत. गेल्या महिन्यात नेपाळने नवी राज्यघटना स्वीकारल्यानंतर या देशातून राजेशाही प्रथाही संपुष्टात आली होती. २००८ मध्ये नेपाळला प्रजासत्ताक देश म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर राम बरन यादव हे या देशाचे पहिले लोकनियुक्त राष्ट्रपती ठरले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25380

Posted by on Oct 29 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1268 of 2458 articles)


=सरोगसीवर केंद्राची सुप्रीम कोर्टात भूमिका= नवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] - कोणत्याही विदेशी दाम्पत्याला सरोगसी प्रक्रियेच्या माध्यमातून अपत्य प्राप्त करण्यसाठी भारतीय ...

×