Home » ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य » विधानसभा निवडणूक : तिसरा टप्पाही विक्रमी

विधानसभा निवडणूक : तिसरा टप्पाही विक्रमी

=जम्मू-काश्मीर ५९ टक्के, झारखंड ६१ टक्के=
jammu-kashmir-and-jharkhand-01नवी दिल्ली, [९ डिसेंबर] – विधानसभा निवडणुकीचे पहिले दोन्ही टप्पे शांततेत आणि विक्रमी मतदानाने पार पडल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये मंगळवारी तिसर्‍या टप्प्यातही विक्रमी मतदान झाले. झारखंडमध्ये विधानसभेच्या १७ जागांसाठी ६०.८९ टक्के आणि जम्मू-काश्मिरात १६ जागांसाठी ५९ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. ही आकडेवारी वाढण्याची शक्यता निवडणूक आयोगाने वर्तविली आहे.
दोन्ही राज्यांमध्ये मतदान शांततेत पार पाडण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पहिले दोन्ही टप्पे विक्रमी मतदानाचे ठरल्यानंतर तिसर्‍या टप्प्याच्या आधी काश्मिरात दहशतवाद्यांनी लष्करी तळावर शक्तिशाली हल्ला केला होता. यात ११ जवान शहीद झाले होते. जवानांनीही सहा अतिरेक्यांचा खात्मा केला होता. तथापि, अतिरेक्यांच्या या भ्याड हल्ल्याला न जुमानता मोठ्या प्रमाणात काश्मिरी नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडला. बहुतेक सर्वच मतदान केंद्रांवर लांबचलांब रांगा लागलेल्या होत्या. यात महिला मतदारांची संख्य लक्षणीय होती. झारखंडच्या गिरीडिह जिल्ह्यात नक्षलवादी आणि जवान यांच्यात चकमक झाली. तथापि, यात कुठलीही प्राणहानी झाली नाही. तर, काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर अतिरेक्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. त्याचाही मतदारांवर परिणाम झाला नाही. मतदानाबाबतची अंतिम आकडेवारी अद्याप प्राप्त झालेली नसल्याने दोन्ही राज्यांमधील टक्केवारी वाढण्याची शक्यता आयोगाने वर्तविली आहे.
झारखंडमध्ये १७ जागांसाठी आठ आमदारांसह २८९ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये बंद केले. यात २६ महिलांचा समावेश आहे. तर, काश्मीर खोर्‍याच्या बदगाम, पुलवामा आणि बारामुल्ला या तीन जिल्ह्यांतील १६ जागांवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, तीन मंत्री आणि १० आमदारांसह १४४ उमेदवारांचे भवितव्य मशिनबंद झाले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18898

Posted by on Dec 10 2014. Filed under ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य (2322 of 2452 articles)


=राजनाथसिंह यांची ग्वाही= नवी दिल्ली, [९ डिसेंबर] - राजधानीत एका बहुराष्ट्रीय कंपनीतील युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा ...

×