Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » विधान परिषद सभापतिपदी रामराजेंची फेरनिवड

विधान परिषद सभापतिपदी रामराजेंची फेरनिवड

=वातावरण बदलांवर अभ्यासासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती=
ramraje-naik-nimbalkarमुंबई, [८ जुलै] – विधान परिषदेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी कॉंगे्रसचे रामराजे निंबाळकर यांची शुक्रवारी विधान परिषदेच्या सभापतिपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सभागृहाच्या नेतेपदी चंद्रकांत पाटील, तर विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली. वातावरण बदलाचे आव्हान लक्षात घेता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती गठित करून वातावरण बदलाचा अभ्यास करण्याचा मनोदय नवनियुक्त सभापती रामराजे निंबाळकर यांनीजाहीर केला.
विधान परिषदेचे सभापती निवडीसाठी राज्यपाल सी. विद्यासागर यांनी आ. जयंत पाटील यांची हंगामी सभापती म्हणून निवड केली होती. त्यांनीच विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांना शपथ दिली. रामराजे निंबाळकर, दिवाकर रावते, सुभाष देसाई, सदाभाऊ खोत, नारायण राणे, धनंजय मुंडे, प्रवीण दरेकर, सुरजितसिंह ठाकूर, आ. एन. सिंह यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. त्यानंतर सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. कॉंग्रेसचे आमदार माणिकराव ठाकरे यांनी रामराजेंच्या सभापती निवडीचा प्रस्ताव मांडला, त्याला राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विधान परिषद सभागृहाने एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह विरोधी सदस्यांनी रामराजेंना सभापतींच्या आसनापर्यंत नेले.
नवनिर्वाचित सभापती रामराजे निंबाळकर यांनी लगेच चंद्रकांत पाटील यांची सभागृहाच्या नेतेपदी निवड जाहीर केली. त्यानंतर संख्याबळाच्या आधारावर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असतील, असे जाहीर केले. त्यांच्या निवडीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदचा प्रस्ताव मांडला. त्यावर सुनील तटकरे, शरद रणपिसे, नारायण राणे, दिवाकर रावते यांची भाषणे झाली.
अभिनंदन प्रस्तावाच्या उत्तरात रामराजे निंबाळकर म्हणाले की, सभागृहाच्या कामकाजाचा केंद्रबिंदू राज्यातील सर्वसामान्य जनता आहे. शेतीवरील वातावरण बदलाचे संकट पाहता, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची एक संयुक्त समिती नेमून जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घटनांचा अभ्यास करावा. जिल्हा आणि तालुका पातळीवर जिल्हा नियोजन मंडळांच्या धर्तीवर या समितीने काम करावे. विधान परिषद कामकाजाचे नियम देखील बदलण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29072

Posted by on Jul 9 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (151 of 2451 articles)


आठवले सामाजिक न्याय; भामरे संरक्षण राज्यमंत्री स्मृती इराणींकडे वस्त्रोद्योग प्रकाश जावडेकर नवे मनुष्यबळ विकास मंत्री नवी दिल्ली, [५ जुलै] ...

×