Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » विमान अपघातातच झाला नेताजींचा मृत्यू!

विमान अपघातातच झाला नेताजींचा मृत्यू!

=ब्रिटनच्या वेबसाईटवर खुलासा=
netaji subhashchandra boseलंडन, [१६ जानेवारी] – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गुढ अजूनही कायम असताना आणि त्यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात असताना, तायवान येथील विमान अपघातात गंभीर जखमी झाल्यानेच नेताजींचा मृत्यू झाला होता, असा खुलासा करणारे नवे दस्तावेज ब्रिटनमधील एका वेबसाईटवर टाकण्यात आले आहेत.
१८ ऑगस्ट १९४५ रोजी तायपेयी विमानतळाजवळ नेताजींच्या विमानाला अपघात झाला होता. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा लगेच मृत्यू झाला होता, असे या घटनेचे साक्षीदार असलेल्या पाच जणांनी या नव्या दस्तावेजांमध्ये म्हटले आहे. यात नेताजींचे अतिशय जवळचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान खान यांचाही समावेश आहे. पाचही साक्षीदारांच्या मतांमध्ये कुठलाही फरक नाही. नेताजींच्या मृत्यूबाबत त्यांनी एकसारखेच मत व्यक्त केले आहे. यात जपानच्या दोन डॉक्टरांचा आणि तायवानमधील एका परिचारिकेचा समावेश आहे, असे यात नमूद आहे.
हबिबूर रहमान खानही या विमानातून नेताजींसोबत प्रवास करीत होते. तथापि, या अपघातातून ते सुदैवाने वाचले होते. अपघातानंतर २४ ऑगस्ट रोजी खान यांनी नेताजींच्या मृत्यूची माहिती देणारे निवेदन तयार केले होते आणि त्यावर आपली स्वाक्षरीही केली होती. त्यांचा हाच दस्तावेज या वेबसाईटवर टाकण्यात आला आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर नेताजी मला म्हणाले होते की, ‘माझा अंत आता जवळ आला आहे. मी वाचू शकणार नसल्याने माझ्या मृत्यूची माहिती भारतीयांना द्या. मी देशासाठी लढा दिला आहे आणि आता देशासाठीच आपले प्राण देत आहे. भारत स्वतंत्र होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्यास भारतीयांना सांगा,’ असेही खान यांनी या निवेदनात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26538

Posted by on Jan 17 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (908 of 2458 articles)


=इसिसला रोखण्यासाठी सज्ज= नवी दिल्ली, [१६ जानेवारी] - सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांतून तरुणांवर होणारा इसिस या जहाल दहशतवादी संघटनेचा ...

×