Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » विरोधकांजवळ मुद्दे नाही, ही खंतच

विरोधकांजवळ मुद्दे नाही, ही खंतच

=कॅगच्या अहवालात गडकरींचे नाव नाही : अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती=
arun-jaitley2नवी दिल्ली, [१२ मे] – पूर्ती साखर कारखान्याच्या मुद्यावरून सातत्याने गोंधळ घालत असलेल्या विरोधकांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज मंगळवारी राज्यसभेत जोरदार चिमटा घेतला. कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसतानाही त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गोंधळ घालण्याची वेळ तुमच्यावर यावी, हे तुमच्यावर ओढवलेल्या दयनीय स्थितीचे प्रतीकच आहे, असा टोला जेटली यांनी हाणला.
सरकारने नागरिकांच्या कल्याणासाठी काही विधेयके आणली आहेत. पण, ती पारित होऊ द्यायची नसल्यानेच तुम्ही असा गोंधळ घालत आहात. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहात, पण कॅगने आपल्या अहवालात कुठेही गडकरी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. त्यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. मग, कोणत्या आधारावर तुम्ही गडकरी यांचा राजीनामा मागत आहात, असा स्पष्ट सवाल जेटली यांनी विरोधकांना विचारला.
सततचे पराभव, निराश नेते आणि नेतृत्वाचा मुद्दा यामुळे कॉंगे्रस पक्षात अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. त्यातच नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरता येईल, असा एकही मुद्दा या पक्षाकडे नाही. त्यामुळेच त्यांच्यावर गडकरी यांच्या राजीनाम्यासारखे विषय घेऊन गोंधळ घालण्याची बिकट वेळ आली आहे. कॅगच्या अहवालात गडकरी यांचे नावच नसल्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असेही जेटली यांनी स्पष्ट केले.
या गोंधळातच सभागृहाचे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी कॉंग्रेसची मागणी फेटाळून लावत कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. पण, गोंधळाच्याच पवित्र्यात असलेल्या कॉंग्रेस सदस्यांनी गोंधळाची धार आणखी तीव्र केली. यामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22520

Posted by on May 12 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1702 of 2453 articles)


=राजद, जदयु स्वतंत्रपणे लढणार विधानसभेची निवडणूक= पाटणा, [१२ मे] - देशभरातील भाजपाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रचंड गाजावाजा करून अनेक तुकड्यात ...

×